आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंची गर्दी, कोट्यवधींचा खर्च ; छायाचित्रातून पाहा भाजपची 'हुंकार रॅली'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाची हुंकार रॅली झाली. त्याआधी पाटण्यात सात साखळी बॉम्बस्फोट झाले. मात्र त्यानंतरही नरेंद्र मोदींच्या प्रमुख् उपस्थितीत रॅली झाली. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. स्फोटानंतरही लोक मैदानात बसून होते हे विशेष.
भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांनी ही देशातील सर्वात मोठी सभा असल्याचे त्यांच्या भाषणात म्हटले आहे. बिहारच्या प्रत्येक भागातून या सभेसाठी लोक आले होते. मोदींच्या या सभेसाठी बिहार भाजपने जोरदार तयारी केली होती. सभेच्या प्रचार-प्रसार आणि भव्य व्यासपीठ पाहून यासभेसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले असण्याचा अंदाज आहे. मात्र भाजपने सभेसाठी किती खर्च झाला आहे याची माहिती दिलेली नाही.
पुढील छायाचित्रांतून पाहा हुंकार रॅली...