आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi\'s Rally Today In Naxal Affected Districts Of Jharkhand Amid Naxal Band

पहिल्याच वाक्यात मोदींची जीभ घसरली; म्हणाले, ही 14व्या लोकसभेसाठीची निवडणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र् मोदी यांनी गुमला येथील सभेला संबोधीत करताना पहिल्याच वाक्यात मोठी चुक केली. ते म्हणाले, 'हे 2014 सुरु असून 14व्या लोकसभेसाठी मतदान होणार आहे.' त्यांची अशी जीभ घसरल्याने मंचावरील सर्वच अवाक् झाल होते. मात्र, नंतर मंचवरील उपस्थितांनी चुक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्यात दुरुस्ती केली.
नक्षलवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री बिहारमध्ये दोन मोबाईल टॉवर उडवून देत आज (गुरुवार) बिहार आणि झारखंड बंदचे आवाहान केले. त्यानंतरही मोदींची सभा झाली. नक्षलवाद्यांच्या बंदच्या आवाहनावर ते म्हणाले, 'माओवाद्यांनी आज लोकशाहीला आव्हान दिले आहे.' झारखंडच्या खनिज संपत्तीची स्तुती करतना ते म्हणाले, ' येथील खनिज संपत्तीच्या जोरावर बाहेरुन आलेले लोक श्रीमंत झाले मात्र, येथील गरीबी काही सरली नाही.' काँग्रेसवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. आदिवासींसाठी काँग्रेसने काहीच केलेल नाही. त्यांचे भले फक्त भाजपच करु शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नक्षलवाद्यांनी केलेल्या बंदच्या अवाहनाचा मोदींच्या सभेवर परिणाम झाल्याचे दिसले. भाजपला आपेक्षीत गर्दी गुमला एअरपोर्ट मैदानावर जमली नव्हती.
मोदींनी भाषणाच्या सुरवातीलाच, झारखंड वीर आणि त्यागी पुरुषांची भूमी असल्याचे म्हटले. जवळपास 11.25 वाजता ते विशेष हेलिकॉप्टरने गुमला एअरपोर्टवर आले.
माओवाद्यांनी आज बिहार आणि झारखंड बंदचे आवाहन केले आहे. याचा परिणाम दोन्ही राज्यात सर्वत्र जाणवत आहे. नक्षलप्रभावीत जिल्ह्यांमध्ये वाहनांची संख्या रोडावली आहे.
गुमला नंतर मोदींची चतरा येथे सभा होणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे