आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या सभेत पोलिसांचा लाठीचार्ज, लोकांनी दगड-बुट-चप्पलचा केला मारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गया / सासाराम - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गया येथील सभेत अनियंत्रित झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे संतप्त जमावाने बुट-चप्पल आणि दगडांचा मारा करुन पोलिसांवर हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने वरिष्ठ नेत्यांनी संतप्त जमावाला कसेतरी शांत केले. मोदींचे सभास्थानी आगमन झाल्यानंतर सर्व वातावरण निवळले. मात्र, मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या सभेत असा गोंधळ होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ होती.

का झाला गोंधळ
बिहारमधील सासाराम येथील सभेनंतर मोदी गया येथील गांधी मैदानावर दाखल झाले. बराच वेळची वाट पाहात असलेले लोक मोदींना पाहाण्यासाठी व्हीव्हीआयपी गॅलीरीत घुसण्याचा प्रयत्न करु लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला. लोक मात्र ऐकायला तयार नव्हते. पोलिसांना धक्के देऊन बळजबरीने मंचाकडे आणि गॅलरीकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न सुरुच होता. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याला जमावाने दगड आणि चपलांचा मारा करुन उत्तर दिले. संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला करताना हातात जी वस्तू येईल ती फेकण्यास सुरवात केली. बराच वेळ हा गोंधळ सुरु होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी मंचावरुन शांततेचे आवाहन केले. त्यालाही कोणी दाद दिली नाही. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी मंचावरुन भाषणाला सुरवात केली, तेव्हा जमाव शांत झाला.
गयामध्ये काय म्हणाले मोदी
मैदानात उपस्थित जनसमुदायावर नजर फिरवत नरेंद्र मोदी म्हणाले, विरोधकांनी येथे येऊन एकदा हा नजारा पाहावा. एवढा मोठा जनसमुदाय मी याआधी कधीही पाहिला नाही. ही पहिली निवडणूक आहे, ज्यात मतदान अजून झाले नाही मात्र निकाल घोषित झाला आहे.
विरोधकांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, दहा वर्षे झाली आहेत, केंद्रात काँग्रेसचे यूपीए सरकार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही बदल झाला आहे का?
त्याआधी मोदींची बिहारच्या सासाराम येथे सभा झाली. येथे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त)चे नेते नितीशकुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मोदींनी केंद्रातील काँग्रेस सरकारवरही हल्लाबोल केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सवाल उपस्थित केला. मोदी म्हणाले, काँग्रेस गरीबांसोबत असल्याचा दावा करते. मात्र, सुप्रीम कोर्टाला सांगावे लागते, धान्य सडण्यापासून वाचवण्यासाठी ते गरीबांमध्ये वाटून द्या. तेही काँग्रेस सरकार ऐकत नाही.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, मीराकुमार यांच्या मतदारसंघात काय म्हणाले मोदी