आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी कार्यकर्त्यांचा देव, त्यांच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही; माजी सपा मंत्र्यांचे व्क्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरदोई - समाजवादी पार्टीचे खासदार आणि माजी मंत्री नरेश अग्रवाल यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्वतःला देवाची उपमा दिली. ते म्हणाले, कोणी त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. युपीमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच नेते कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत. 

BJP नेत्यांना म्हटले खोटारडे... 
अग्रवाल म्हणाले, देशहिताबाबत बोलणाऱ्या बीजेपीकडे एखादा कार्यकर्ता गेला तर ते त्याला चुकीचे काम करत असल्याचे सांगून टाळण्याचा प्रयत्न करतात. अरे पण जर चांगले काम करायचे असते तर लोक नेत्यांकडे कशाला आले असते. नेत्यांचे काम कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहणे आहे. मग भलेही त्यासाठी नियम बदलले तरी हरकत नाही. 

योगींवर टीका 
सीएम योगींच्या अँटि रोमियो स्क्वाडवर टीका करताना ते म्हणाले, ज्यांचे लग्नच झाले नाही त्याला काय माहित रोमियो काय असतो. तुम्ही जर तरुणांना त्रास द्याल तर तरुण तुम्हाला मतदानातून त्रास देईल. तरुण सज्ञान असताता त्यांना मोकळीक द्यायला हवी. 

हिंदू देवतांसंबंधी वादग्रस्त वक्तव्य 
19 जुलैला नरेश अग्रवाल राज्यसभेत बोलताना म्हणाले होते, 1991 मध्ये राम जन्मभूमी आंदोलनादरम्यान अनेक 'रामभक्त' तुरुंगात गेले होते. त्यावेळी अनेक शाळांना  तात्पुरते तुरुंग बनवण्यात आले होते. अशाच एका तुरुंगात तेही गेले होते. त्यांनी त्याठिकाणी भिंतींवर लिहिलेल्या दोन ओळी वाचल्या होत्या. त्या त्यांनी राज्यसभेत सांगितल्या. यामध्ये हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरलेले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...