आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलीच्या सकाळी विधानसभा, रुग्णालयात कोडनानींना भेटलो; नरोडा दंगलप्रकरणी शहांची साक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी २००२ च्या नरोडा गावच्या दंगल प्रकरणातील आरोपी माजी मंत्री माया कोडनानी यांच्या बचावासाठी साक्ष दिली. दंगलीच्या दिवशी सकाळी गांधीनगरात विधानसभा व सरकारी रुग्णालयात माया यांना भेटलो, असे शहा यांनी एसआयटी काेर्टाला सांगितले. मात्र, रुग्णालयानंतर त्या कुठे गेल्या याची माहिती नसल्याचेही शहा म्हणाले. गोध्र्याच्या दंगलीनंतर २८ फेब्रुवारी २००२ रोजी नरोडा गावात दंगल उसळली होती. या प्रकरणी कोडनानीसह ८२ जणांिवरुद्ध खटला सुरू आहे. घटनेदिवशी नरोडा गावात नव्हे तर विधानसभेत व सोला सरकारी रुग्णालयात होतो, असा कोडनानी यांचा दावा आहे. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून शहा यांना पाचारण करण्याची मागणी केली होती.
 
कोडनानी व शहा २००२ मध्ये आमदार होते. सर्वाेच्च न्यायालयाने तीन आठवड्याआधी एसआयटी न्यायालयाला आदेश देत सुनावणी ४ महिन्यांत पूर्ण करण्यास सांगितले होते. नरोडा गाव दंगलीचा २००२ च्या ९ मोठ्या दंगलीत समावेश होतो. नरोडा पाटिया दंगलीत ९७ जणांच्या हत्येच्या आरोपात कोडनानीना दोषी ठरवत २८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 
 
प्रश्नोत्तरे
- सरकारी वकील :  कोडनानी यांच्या बाजूने आतापर्यंत साक्ष का दिली नाही? 
-  अमित शहा : मला याआधी कधी विचारणा झाली नाही.
-  सरकारी वकील: २८ फेब्रुवारी राेजी तुम्ही कुठे होता?
-  अमित शहा: सकाळी ७.१५ वाजता घरातून विधानसभेसाठी निघालो. सभागृहाचे कामकाज
८.३० वाजता सुरू होणार होते. तिथे गोध्राकांडातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
 कामकाज २०-२५ मिनिटे चालले. विधानसभा अध्यक्ष व सदस्यांसोबत मायाबेन सभागृहात होत्या.
बातम्या आणखी आहेत...