आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narrow Roads In Nelang Vally In Himachal Pradesh

या ठिकाणी जाऊ शकत नाहित विदेशी पर्यटक, 11 हजार फुटांवर आहे लाकडी पूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देहरादून/शिमला- उत्तरकाशी जिल्ह्यातील नेलांग व्हॅली रस्त्यांचा समावेश जगातील धोकादायक रस्त्यांमध्ये केला जातो. 1962 मध्ये भारत-चीन युद्धानंतर या परिसरात पर्यटकांवर बंदी घालण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वीच ही बंदी मागे घेण्यात आली आहे. या ठिकाणाला उत्तराखंडचे लढाख असेही म्हटले जाते.
वर्षभर बर्फ वितळत नाही
- भारत-चीन सीमेजवळ नेलांग व्हॅलीत असलेल्या लाकडी पूलावरुन जाणे अत्यंत धोकादायक आहे. हा पूल अत्यंत अरुंद आहे. या व्हॅलीची उंची समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 11,000 फूट आहे. वर्षभर येथील बर्फ वितळत नाही.
- फार वर्षांपूर्वी या व्हॅलीतून भारत आणि चीनमध्ये व्यापार चालायचा. गंगोत्री नॅशनल पार्कमध्ये असलेल्या या व्हॅलीत नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये प्रवेश करण्याची बंदी आहे.
रात्री राहता येत नाही
- या व्हॅलीत रात्री येण्याची कुणालाही परवानगी नाही. सुरक्षेच्या कारणास्तव विदेशी लोकांना येथे येण्याची बंदी आहे.
- भारत आणि चीनच्या युद्धात नेलांग आणि जाढूंग ही गावे रिकामी करण्यात आली होती. ती आजही तशीच आहेत.
- येथे प्रवेश करण्यासाठी प्रशासनाकडून इनर लाइन परमिट घ्यावे लागते. त्यानंतर वन विभागातून परवानगी मिळवावी लागते.
पुढील स्लाईडवर बघा, धोकादायक नेलांग व्हॅली.... येथील अरुंद लाकडी पूल....असा करावा लागतो कच्च्या रस्त्यांवरुन प्रवास...