आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • NASA After 25 Years Give Green Signal Of India's Neptune Research

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताच्या नेपच्यून संशोधनास नासाकडून 25 वर्षांनंतर मान्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - नासाने नेपच्यूनचे आवरण व उपग्रहाच्या संशोधनाला 25 वर्षांनंतर मान्यता दिली आहे. भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जे.जे. रावल यांनी 1989 मध्ये केलेल्या संशोधनात नेपच्यून ग्रहामध्ये चार अज्ञात वलये तसेच त्यास अनेक नवे उपग्रह असल्याचे म्हटले होते. नासाने हे संशोधन 25 वर्षांनंतर योग्य ठरवले.

हबल दुर्बिणीने पाठवलेल्या छायाचित्रांत नेपच्यूनच्या एस 2004 एन 1 नावाच्या ग्रहाचा शोध लागला होता. नासाने हबल दुर्बिण 1990 मध्ये अंतराळात पाठवली आहे. नेपच्यूनच्या उपग्रहांची संख्या आता 14 झाली. रावल द इंडियन प्लॅनेटरी सोसायटीचे अध्यक्ष, राजकोटच्या ओ. वे. शेठ लोकविज्ञान केंद्राचे विश्वस्त आहेत.


क्युरीऑसिटीचा बर्थ डे!
नासाने मंगळावर पाठवलेल्या क्युरीऑसिटी यानाला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले. तांबड्या ग्रहावरील जीवसृष्टीचा मागोवा घेण्यासाठी यानाच्या माध्यमातून संशोधन सुरू आहे. आतापर्यंत मंगळावरील अनेक प्रकारची नवीन माहिती संकलित करण्यात नासाला यश आले आहे. नासाने 2021 मध्ये नवीन मोहिम हाती घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.