आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळावर पाण्याची घळण, गेल्या तीन वर्षांत तयार झाल्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - नासाच्या अंतराळ यानाने मंगळाच्या पृष्ठभागावर पाण्याची नवीन घळण शोधून काढली असून ती मागील तीन वर्षांतच तयार झाली असावी, असे मानले जात आहे. नासाच्या मार्स रेकनॉइस्सेन्स ऑर्बिटर या अंतराळ यानावरील ‘हायराइज’ अर्थात उच्च संकल्प चित्रीकरण वैज्ञानिक उपकरण या कॅमेर्‍याने नोव्हेंबर 2010 आणि मे 2013 टिपलेल्या छायाचित्रामध्ये मंगळाच्या दक्षिण हायलँडवरील सरोवराच्या भिंतीच्या उतारावर पाण्याची नवीन घळण निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे. याच कॅमेर्‍याने या ठिकाणी 5 नोव्हेंबर 2010 रोजी टिपलेल्या छायाचित्रांमध्ये ही घळण आढळून आली नाही. ही घळण पृथ्वीवरील नदीच्या प्रवाहासारखीच दिसते. ती पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेली नसली तरी कार्बन डायऑक्साइडच्या दवामुळे तयार झालेली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घळणींची निर्मिती काही नवीन नाही. एका गुंफेतून वस्तू प्रवाहित होत असून जुना प्रवाह फोडून ती नवीन मार्गाने प्रवाहित होत असल्याचे या छायाचित्रांमध्ये दिसते.