आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चपलांच्या कारखान्यात काम करायचा हा क्रिकेटपटू, आता वडिलांसाठी बांधतोय कोट्यवधींचा बंगला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटपटू नाथू सिंह आपल्या आईवडिलांसाठी जयपूरमध्ये आलिशान घर बांधत आहे. - Divya Marathi
क्रिकेटपटू नाथू सिंह आपल्या आईवडिलांसाठी जयपूरमध्ये आलिशान घर बांधत आहे.
जयपूर - आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स संघांमधून खेळलेला नाथू सिंह याला कधीकाळी क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी राहते घरसुद्धा विक्रीला काढले होते. आज नाथू सिंह जयपूरमध्ये आपल्या वडिलांसाठी दीड कोटी रुपये खर्च करून एक आलिशान बंगला बांधतोय. फादर्स डेच्या औचित्याने divyamarathi.comने त्याच्याशी बोलून जाणून घेतले की त्याच्या वडिलांनी कशाप्रकारे संघर्ष करून त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
 
मुलासाठी कर्ज काढले, दिवसरात्र केली मजुरी...
- जयपूरचा 21 वर्षीय नाथू सिंह मध्यमगती गोलंदाज आहे. आयपीएलच्या 9व्या मोसमात मुंबई इंडियन्सने त्याला 3.5 कोटी रुपयांत घेतले होते. आयपीएलच्या 10व्या मोसमात नाथू सिंह गुजरात लायन्स संघाकडून खेळला. 
-वडिलांच्या संघर्षाविषयी नाथू सिंह म्हणतो, "मी 16 वर्षांचा असताना क्रिकेट खेळणे सुरू केले. तेव्हा घरची परिस्थिती ठीक नव्हती. परंतु क्रिकेटबद्दल माझी आवड पाहून वडिलांनी मला काहीही कमी न पडू देण्याचा निश्चय केला. खेळायला लागलो तेव्हा महागडे बूट घेण्याची ऐपत नव्हती. वडिलांनी व्याजाने पैसा काढून मला 5 हजारांचे बूट घेऊन दिले. माझ्यासाठी स्वत: ओव्हरटाइम करू लागले. त्यांना घरखर्चासोबत माझाही खर्च होताच. ते नेहमी म्हणायचे, तू जे काही करत आहेस, मन लावून कर. मी तुझ्यासाठी सर्वकाही करायला तयार आहे. अगदी घर विकावे लागले तरी...'
 
नाथू आता बांधतोय आलिशान बंगला...
दोन वर्षांपूर्वी बुटांसाठी तरसणारा नाथू सिंह आपल्या मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांसाठी जयपूरमध्येच दीड कोटी रुपये खर्चाचा तीन मजली आलिशान बंगला बांधत आहे. लवकरच तो पूर्ण कुटुंबासह या बंगल्यात राहायला जाणार आहे. त्याचे वडील भरतसिंह म्हणतात, नाथू शांत स्वभावाचा आहे. परंतु कुटुंबासाठी काहीही करण्याची त्याची तयारी आहे. त्याच्या मेहनतीचे त्याला निश्चितच फळ मिळेल. तीन वर्षांपूर्वी नाथू स्वत: चपलांच्या कारखान्यात काम करत होता.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, नाथू सिंहच्या परिवाराचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...