आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील पहिली फ्युएल सेल बस तयार, धावणार मात्र हायड्रोजनवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - टाटा मोटर्स लिमिटेड तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोने देशातील पहिल्या फ्युएल सेल आधारित बसची निर्मिती केली आहे. यामध्ये इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर केला जातो. तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रोच्या लिक्विड प्रोपल्सन सिस्टिम्स सेंटरमध्ये बसचे प्रदर्शन करण्यात आले.


अनेक वर्षांच्या प्रयत्नांचे फलित
इस्रो, टाटा मोटर्सची निर्मिती
रॉकेट इंधनासारखी प्रणाली
हायड्रोजन सेल क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचे उपउत्पादन आहे. इस्रो गेल्या काही वर्षांपासून ते विकसित करत आहे. यामध्ये संपूर्ण क्रायोजेनिक तंत्रज्ञानाऐवजी द्रवरूप हायड्रोजनचा वापर केला जातो. इस्रो द्रवरूप हायड्रोजनच्या वापराबाबत प्रसिद्ध आहे. क्रायोजेनिक प्रणालीचा वापर रॉकेट इंजिन तयार करण्यासाठी केला जातो.


2006 मध्ये करार
हायड्रोजनवर चालणार्‍या बस निर्मितीसाठी इस्रो तसेच टाटा मोटर्सने 2006 मध्ये करार केला होता. इस्रोचे मानद सल्लागार व्ही. जी. गांधी तसेच टाटा मोटर्सचे उपमहाव्यस्थापक डॉ. एम. राजा यांनी यासंदर्भात घोषणा केली.

एसी युनिट
फ्युएल सेल कूलिंग
हायड्रोजन स्टोअरेज
इलेक्ट्रॉनिक कूलिंग
ड्राइव्ह सिस्टिम
एनर्जी स्टोअरेज सिस्टिम