आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ दिल्लीच्या आधारे नव्हे, ३० स्तंभांवर देश करेल वाटचाल - मोदींचे आश्वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्नपूर (प. बंगाल) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी बर्नपूर येथे पोलाद कारखान्याचे लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी भाजपच्या असलेल्या जुन्या नात्याला उजाळा दिला. नव्याने स्नेह दाखवत केंद्र व राज्य सरकारांनी "टीम इंडिया' बनून कार्य करावे, असे आवाहनही केले. आता दिल्लीसारख्या एका स्तंभावर नव्हे, सर्व राज्यांचा एक याप्रमाणे ३० स्तंभांच्या आधारे देश वाटचाल करेल, असेही मोदी म्हणाले.

तत्पूर्वी बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र व राज्य सरकारांमध्ये असलेल्या तणावपूर्ण संबंधांवर भाष्य केले हाेते. यावर बोलताना माेदी म्हणाले, "मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. दुर्दैवाने केंद्र-राज्य संबंधांत नेहमीच तणाव असतो. मी स्वत: अनेक वर्षे मुख्यमंत्री होतो. राज्यांना अशी वागणूक दिल्याने देशाचे भले होणार नाही, हे मला चांगले ठाऊक आहे. म्हणूनच आम्ही खूप मोठे बदल केले आहेत. को-ऑपरेटिव्ह, कॉम्पिटिटीव्ह फेडरॅलिझम आम्ही मांडला. नीति आयोग स्थापन केला. पहिल्या दिवसापासून मी हेच सांगतो आहे की, टीम इंडियाशिवाय भारत विकास साध्य करू शकणार नाही. पंतप्रधान-मुख्यमंत्री ही एक टीम आहे. पक्ष कोणताही असो, देशहित पक्षापेक्षा महत्त्वाचे आहे.'

बेलूर मठाला भेट
पंतप्रधान मोदी रविवारी आपल्या गुरुंना भेटण्यासाठी पादत्राणे काढून बेलूर मठात दाखल झाले. हा मठ रामकृष्ण मिशनचे मुख्यालय असून मोदींनी संन्यास घेण्यासाठी तीन वेळा येथे विनंती केली होती. ज्या खोलीत स्वामी विवेकानंद यांनी आपला शेवटचा काळ घालवला त्या खोलीलाही मोदींनी भेट दिली. त्यांच्या पादुकांजवळ ते सुमारे १५ मिनिटे ध्यानस्थ बसले.

अनवाणी पायांनीच...
कारमधून उतरल्यापासून पुन्हा कारमध्ये बसेपर्यंत मोदी अनवाणी पायानेच फिरले. मठाने त्यांच्या स्वागताबाबत विचारले, तेव्हा "मुलगा घरी येतो तेव्हा त्याचे स्वागत केले जाते का?' असा प्रश्न त्यांनी केल्याचे मठाचे सहायक सचिव स्वामी सुबीरानंद यांनी सांगितले.

बहिणीला शोधायचेय, मदत करा, चिनी महिलेचे मोदींना साकडे
जेनिफर आन या चेन्नईमध्ये राहणा-या चिनी महिलेने आपल्या बहिणीचा चीनमध्ये शेाध घेण्यासाठी मदत करावी, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना िलहिलेल्या पत्रात केली आहे.

जेनिफर पत्रात म्हणते, ‘पंतप्रधान मोदीजी, आपण नेपाळमध्ये हरवलेल्या एका मुलाची माता-पित्याशी भेट घालून दिली होती. मलाही माझी हरवलेली बहीण हवी आहे. आपण चीनला जात आहात. मला या कामी मदत करा.’ जेनिफर ही चीनमधील नौदलातील अिभयंते आन ची पोंग यांची मुलगी आहे. दुस-या महायुद्धाच्या काळात ती चेन्नईमध्ये स्थायिक झाली होती. तिला आपल्या सावत्र बहिणीला भेटावयाचे आहे. मात्र, चीनसारख्या देशात तिला शोधणार कुठे, हा तिच्यासमोर मोठा प्रश्न आहे. वडील पोंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात मरिन इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. त्यानंतर ते काही काळ मुंबईत व नंतर मद्रासमध्ये स्थायिक झाले.