आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयललितांच्या शपथग्रहणाच्या मुहूर्तासाठी 20 सेंकंदात उरकले राष्ट्रगीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - अण्णा द्रमूकच्या प्रमुख जयललिता यांच्या शपथग्रहण सोहळ्यात उच्चपदस्थ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसमोर संविधानिक कायद्याचे उल्लंखन करण्यात आले. मद्रास विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या शपथग्रहण कार्यक्रमात 52 सेकंदांचे राष्ट्रगीत 20 सेकंदात संपवण्यात आले. जयललितांच्या शपथविधीचा मुहूर्त टळू नये यासाठी असे करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मात्र राष्ट्रगीताची पूर्ण धून वाजवण्यात आली.

शुभ मुहूर्तावर घरातून निघाल्या
जयललिता सकाळी दहा वाजून 37 मिनिटांनी शपथग्रहण सोहळ्यासाठी घरातून निघाल्या. बरोबर 11 च्या ठोक्याला त्या मद्रास विद्यापीठाच्या सभागृहात दाखल झाल्या आणि अर्ध्या तासात कार्यक्रम संपला. सूत्रांच्या माहितीनुसार, जयललितांचा ज्योतिषावर मोठा विश्वास आहे. त्या त्यांचे प्रत्येक काम मुहूर्त पाहून करतात. आठ महिन्यानंतर जेव्हा शुक्रवारीत त्या सार्वांसमोर आल्या. तेव्हा पत्रकारांना सांगण्यात आले होते, की दुपारी 1 वाजून 28 मिनीटांनी त्या समोर येतील.
हिरवी साडी आणि शनिवारचे नाते
जयललिता यांनी शपथविधी सोहळ्यासाठी आज हिरवी साडी नेसली होती. त्यांनी हिरव्या रंगाच्या पेननेच स्वाक्षरी केली. त्यांच्या बोटातील अंगठीमध्ये हिरवा रत्न होता. हिरवा आणि मरुन रंग त्या शुभ मानतात. जयललिता यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे पाचही वेळेस त्यांनी शनिवारीच शपथ ग्रहण केली आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, हिरवा पेन, अंगठीत हिरवा रत्न