आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्या पतीला पत्नीने बेदम झोडपले, मारहाणीत मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत (हरियाणा) - येथील संजय कॉलनी भागात गुरुवारी रात्री एका पित्याने जन्मदात्या मुलीच्या आब्रुवर हात टाकल्याच्या कारणाने त्याच्या पत्नीने त्याला जबर मारहाण केली, त्यात तो ठार झाला. शेजाऱ्यांनी सांगितले की महिलेने तिच्या पतीच्या डोक्यात मुसळ घालून त्याला ठार केले. घटनेनंतर महिला फरार झाली आहे.
गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान मयत बलकार दारुची नशा करुन घरी आला. तो त्याच्या लहान्या मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. त्याची पत्नी जीतोने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही. त्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडण सुरु झाले. ते एवढे वाढले की पत्नीने मुसळीने त्याला मारहाण केली. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे, की मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हत्येनंतर जीतोने घराचा दरवाजा बंद केला आणि फरार झाली. काही वेळानंतर घरी आलेल्या तिचा मुलगा सौरभने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पित्याला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

मुलीच्या जबाबावर नोंदवला खूनाचा गुन्हा
या प्रकरणाचा तपास करत असलेले ठाणे अंमलदार रामरत्न म्हणाले, बलकाराच्या मोठ्यामुलीने दिलेल्या जबाबावरुन तिच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून जीतोला लवकरच अटक करण्यात येईल.