आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Executive Disquiet In Bjp All Eyes On L K Advani

अडवाणींवर सर्वांच्या नजरा, बोलले तर होऊ शकते मोदी सरकारची पंचाईत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी सकाळी 10 वाजता सुरु झाली आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह आणि त्यांच्यानंतर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी दिपप्रज्वलन करुन बैठकीचे उदघाटन केले. बैठकीच्या सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे भाषण होणार आहे. मात्र, पक्षाला चिंता ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींबद्दल आहे. बैठकीला मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांच्या यादीतून अडवाणी यांचे नाव वगळण्यात आले आहे. यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
पक्षातील एका गट अडवाणींची मनधरणी करत आहे, की ते बोलले तर त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची पंचायत करु नये.तर, दुसरीकडे एका गटाने त्यांना मोकळेपणाने बोलू देण्यासाठी दबाव वाढवला आहे. या गटाचे म्हणणे आहे, की अडवाणींनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या कार्यशैलीवर भाष्य करावे आणि विद्यमान सरकारची तुलना वाजपेयींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारसोबत करावी. अडवाणी 1980 पासून राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये भाषण करत आले आहेत. फक्त 2013 मध्येच त्यांनी भाषण केले नव्हते. त्या कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करण्यात आले होते.
शनिवारी बैठकीच्या शेवटच्या सत्रात अडवाणी भाषण करणार की नाही याबद्दल अजूनही सस्पेन्स कायम आहे. कार्यकारिणीला संबोधित करणार्‍यांच्या पहिल्या यादीत अडवाणींचे नाव होते, मात्र गुरुवारी तयार करण्यात आलेल्या सुधारित यादीतून त्यांचे नाव गायब आहे.
मोदींच्या आधी अडवाणींच्या भाषणामुळे भीती
भाजपच्या एका गटाला चिंता आहे, की शेवटच्या सत्रात पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष शाह यांच्याआधी अडवाणींचे भाषण झाले तर ते पक्षाच्या आणि सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढू शकतात. त्यानंततर मोदींचे भाषण होईल आणि ते पक्ष व सरकारच्या कामाचे कौतूक करु शकतात. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

शाहंचे कौतूक कार्यकर्त्यांना नाही पचले
भाजप पदाधिकार्‍यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सदस्य अभियानाबद्दल पक्षाध्यक्ष अमित शाह यांचे कौतूक केले होते. हे कौतूक कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेले नाही. पक्षाध्यक्षांबद्दल कार्यकर्त्यांच्या अनेक तक्रारी आहेत, असे असताना मोदी पक्षाध्यक्षांचे कौतूक करतात पण त्यांच्या भाषणात पक्षाची खरी स्थिती समोर येत नाही यामुळे कार्यकर्ते नाराज होते. दिल्लीतील पराभवानंतर संघाने भाजप नेतृत्वाला ग्रासरुट लेव्हलवर काम करणार्‍यांसोबत संपर्क ठेवण्यास सांगितले होते, पण पंतप्रधानांच्या भाषणात त्याचा उल्लेख नव्हता.
फोटो - बंगळुरु येथे आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी नेते