आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींना नॅशनल हँडबॉल प्लेअरने लिहिले रक्ताने पत्र, वाचा Suicide Letter

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रावर पुजाने पंतप्रधानांकडे रक्ताने लिहित मदत मागितली. - Divya Marathi
पत्रावर पुजाने पंतप्रधानांकडे रक्ताने लिहित मदत मागितली.
पतियाळा- ऑलिम्पिकमध्ये महिला खेळाडू पदक मिळवून देशाचे नाव रोशन करत असतानाच होस्टेलची फीस देण्यास पैसे नसल्याने व प्रशिक्षकाचा त्रास असह्य झाल्याने पंजाबात राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटूने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. आत्महत्येपूर्वी या खेळाडूने रक्ताने पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या आत्महत्येस कोचच जबाबदार असून त्याला कठोर शिक्षा करा, असे आर्त साकडे घातले आहे.
पतियाळा येथील पूजाकुमारी (२०) ही शालेय पातळीपासून व्हॉलीबॉल खेळत होती. ती राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळलेली उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू होती. तिला तिचा प्रशिक्षक प्रो. गुरुशरण गिल कधी होस्टेमलमध्ये राहण्याच्या कारणावरून, तर कधी चांगल्या खेळाच्या कारणावरून मानसिक त्रास देत असे. पूजाला सेकंड इयरमध्ये प्रवेशानंतर स्थानिक असल्याचे कारण देऊन होस्टेल देण्यात आले नव्हते. पण होस्टेलमध्ये इतर स्थानिक मुली होत्या.
इतर खेळाडूंनाही त्रास
पूजाने ७ पानी पत्र लिहिले असून वरच्या पानावर रक्ताने ‘पीएम मोदीजी’ असे लिहिले आहे. माझे लष्करात जाण्याचे स्वप्न होते. आमच्यासारख्या मुली गरिबी व शिक्षण न मिळाल्याने आत्महत्या करतात. असे होऊ नये यासाठी काहीतरी करा, असेही आवाहन पत्रात आहे. पत्रात कोच प्रो. गिल कबड्डी व हॉकी खेळणाऱ्या मुलींनाही त्रास देत असल्याचे म्हटले आहे. आपल्याला व इतर मुलींना िदलेल्या त्रासाचे पूजाने पत्रात सविस्तर वर्णन केले आहे. तिच्याकडे होस्टेलची फीस भरण्यासाठी ३७२० रुपये नव्हते, असाही उल्लेख आहे.
पुढील स्लाइडसवर वाचा, पुजाने लिहिलेले सुसाइड नोट..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...