आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 स्टार हॉटेलमध्ये झालेल्या तारा-रंजितच्या लग्नाला आले होते बडे नेते-अधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - झारखंडची राजधानी रांचीमधील हायप्रोफाइल लग्न आणि त्यानंतर धर्म परिवर्तनाचे प्रकरण देशभर गाजत आहे. राष्ट्रीय नेमाबाज (शुटर) तारा शाहदेवसोबत हिंदू असल्याची बतावणी करुन रंजित कोहली उर्फ रकिबुल हसनने लग्न केले आणि नंतर तिच्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकला जात होता. या आरोपात रंजितला दिल्लीत अटक केल्यानंतर चौकशीसाठी रांचीत आणण्यात आले आहे. दरम्यान, तारा आणि रंजितच्या लग्नाची छायाचित्रे आणि व्हिडिओ 'दिव्य मराठी नेटवर्क'ला मिळाले आहेत. या लग्नात झारखंडमधील बडे नेते आणि अधिकारी सहभागी झाले होते.
तारा आणि रंजितचे लग्न 7 जुलै रोजी रांचीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मोठा गाजावाजा करुन झाले होते. या लग्नाचा संपूर्ण खर्च रंजितनेच केला होता. लग्न समारंभात राज्यातील अनेक मोठे अधिकारी आणि नेते उपस्थित होते. रंजितच्या 80 वर्षीय आईने देखील हिंदी गीतांवर ठुमके लगावले होते. लग्नाच्या व्हिडिओमध्ये रंजितची आई बराचवेळ डांस करताना दिसते.
मंगळवारी रात्री रंजित आणि त्याच्या आईला दिल्लीत अटक करण्यात आले. त्याच दिवशी त्याने पाच पानांचे पत्र वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि माध्यमांना मेल केले. त्यात त्याने वृद्ध आईची तब्यत बरी नसते असे लिहिले आहे. त्याच्या पत्रानुसार, त्याच्या आईला अनेक व्याधी आहेत. तिच्या कमरेचे हाड बदलण्यात आले असून कृत्रिम हाड बसविण्यात आले आहे.

आईच्या सांगण्यावरुनच केले लग्न
रंजित कोहलीचे म्हणणे आहे, की त्याने मुलगी स्वतः पसंत केली असली तरी आईच्या सांगण्यावरुनच लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर ताराने त्याच्याकडे 15 लाख रुपयांची मागणी केली. तिला ते पैसे तिच्या वडिलांना आणि भावाला द्यायचे होते. ते तिच्याकडे कायम पैशांची मागणी करत होते.
शुटिंग प्रॅक्टिसदरम्यान झाली भेट
ताराचे म्हणणे आहे, की तिची आणि रंजितची भेट क्रीडाग्राममध्ये ती शुटींगची प्रॅक्टिस करत असताना झाली. रंजित तिथे त्याच्या मित्रांसह येत होता. त्याने तेव्हा स्वतःला हिंदू असल्याचे सांगितले होते. क्रीडाग्राममध्ये त्याचा व्यवहार सभ्य आणि शांत असायचा. त्यानेच मी प्रभावित झाले. मात्र, लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी माझ्यावर धर्म परिवर्तनाचा दबाव टाकण्यात आला. त्यासाठी मारझोड होऊ लागली. रकिबुल माझ्या अंगावर कुत्रे सोडत होता. ते मला चावे घेत असत. याही पुढे त्याने आणि त्याच्या आईने मला वेश्या व्यवसायात ढकलण्याची धमकी दिली होती. मला एका फ्लॅटमध्ये कैद करुन ठेवले होते.
रक्षाबंधनानंतर भावाने केली सुटका
रक्षाबंधनाच्या निमीत्ताने ताराने माहेरच्या लोकांना कसेतरी बोलावून घेतले आणि त्यांना एका चिठ्ठीतून सर्व हकिकत सांगितली. ताराच्या भावाने पोलिसांच्या मदतीने त्या घरातून बहिणीची मुक्तता केली. तारा आता किशोरगंज येथे आई-वडिलांसोबत पोलिस संरक्षणात राहाते. तिला आणि तिच्या कुटुंबियांना रंजितचे लोक फोन करुन धमकावतात असा तिचा आरोप आहे.
काय आहे ताराचे आरोप
ताराने सांगितले, 'रकिबुल अनेक तरुणींसोबत संबंध निर्माण करण्याचे प्रयत्न करत असतो. मुलींशी खेळणे हा त्याचा छंद आहे. एक दिवस दोन - तीन मुली घरी आल्या होत्या. त्याच्यासोबत तो नटुन थटून बाहेर गेला होता. काही दिवसानंतर त्याने त्या मुलींचे कॉलेजमध्ये अ‍ॅडिमशन करुन दिले होते. एकदा त्याने त्या मुलींना विचारले होते, की माझे लग्न झाले नसते तर तुम्ही माझ्याशी लग्न केले असते का?'
ताराने आता परत त्याच्या घरात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्दैव काय असते हे फक्त ऐकून होते, मात्र गेल्या काही महिन्यात ते प्रत्यक्ष भोगत आहे.
घटस्फोट घेणार
दरम्यान, तारा शाहदेवने रांचीमध्ये सांगितले की रंजित ऊर्फ रकिबुलसोबत कोणतेही नाते ठेवण्याचा प्रश्नच नाही. तशी इच्छादेखील नाही. आता मला त्याच्या नावाचीदेखील घृणा वाटते. ज्या व्यक्तीच्या धर्माचा पत्ता नाही. तो कधी हिंदू बनतो तर कधी मुसलमान, अशा व्यक्तीवर माझा आता विश्वास बसणार नाही. जो गेल्या सात वर्षांसून नमाज अदा करतो आहे, तो म्हणतो की मी मुस्लिम नाही. इस्लाम धर्म न स्वीकारताच नमाज अदा करतोय. हे कसे शक्य आहे? त्याच्याशी मला आता कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. घटस्फोटासाठी मी लवकरच न्यायालयात अर्ज देणार आहे.
पंतप्रधानांनी याप्रकरणी लक्ष घालून प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत लवकर करण्यास सांगावे, अशी मागणीही तारा शाहदेवने केली आहे.