आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानाबाहेर वडील विकत होते मल्लांचे कपडे, आत मुलीने जिंकले सुवर्णपदक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दिव्या काकरानने महिलांच्या ६८ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले. ती मैदानात लढत असताना तिचे वडील सूरज काकरान बाहेर मल्लांच्या कपड्यांची विक्री करत होते. विजयानंतर दिव्या बाहेर आली आणि तिने पदक वडिलांच्या गळ्यात टाकले. हे तिचे कारकीर्दीतील पहिलेच सुवर्णपदक आहेे. १९ वर्षीय दिव्याच्या मते, कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. आई मल्लांचा गणवेश शिवते आणि वडील ते रस्त्यांवर, मैदानाबाहेर विकतात. इंदूरच्या क्रीडा संकुलातही त्यांनी दुकान लावले आहे. मूळ दिल्लीची असलेल्या दिव्याने या स्पर्धेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे.  फोगाट भगिनींप्रमाणेच दिव्यालाही प्रारंभीचे यश मुलांना हरवूनच मिळाले होते. आता ती अंडर-२३ जागतिक स्पर्धेत पोलंडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.

बातम्या आणखी आहेत...