आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वे बोगदा आजपासून होणार खुला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - अनेक कठीण आव्हाने, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत काश्मीर खो-यात रेल्वेने प्रगतीचा आणखी एक टप्पा गाठला आहे. बनिहालच्या बिचलेही खोरे व काश्मीर खो-यातील कोजीकुंड भागाला जोडणा-या रेल्वे बोगद्याचे मंगळवारी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. याप्रसंगी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहणार असून 25 जूनला हा बोगदा जनतेसाठी खुला होईल. या रेल्वे बोगद्याचे महत्त्व आणि वेगळेपण सांगणारी ही रंजक माहिती.


आशियातील दुसरा लांब बोगदा
आशिया खंडातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा चीनच्या ग्वांसू प्रांतात वुशालओलिंग बोगदा हा आहे. त्याची लांबी 20 किलोमीटर इतकी आहे. तर जगातील सर्वात मोठ्या रेल्वे बोगद्याचे काम सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुरू आहे. काश्मीरमधील हा बोगदा आशियातील दुसरा लांब बोगदा ठरला आहे.