आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रह्मपुत्रेचा प्रवाह काळा होण्याचे कारण नैसर्गिक! राज्यमंत्री मेघवाल यांचा खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली- तिबेटात उगम पावणारी सिआंग नदी अरुणाचल प्रदेशातून वाहत आसाममध्ये प्रवेश करते. आसामात या नदीला ब्रह्मपुत्रा म्हटले जाते. या प्रवाहाच्या मार्गावर भूकंप झाल्याने ब्रह्मपुत्रेचा प्रवाह काळा दिसत असल्याचे केंद्रीय जलस्रोत आणि नदी विकास  राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटले आहे.  ब्रह्मपुत्रेचे पाणी काळे होण्यामागे नैसर्गिक कारण आहे. नदीच्या पाण्याची चाचणी केल्यानंतर असे दिसून आल्याचे मेघवाल यांनी सांगितले. जल प्रदूषणविषयक अहवाल तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय जल आयोगाने आता यामध्ये लक्ष घातले आहे. तज्ज्ञांद्वारे आता नदीच्या प्रवाहाची पाहणी व चाचणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मेघवाल यांनी सांगितले.  


१७ नोव्हेंबर रोजी तिबेटमध्ये भूकंप झाल्यानंतर नदी प्रवाहाला याचा तडाखा बसल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले होते. काँग्रेसचे खासदार निनाँग इरिंग हे अरुणाचल पूर्व येथील लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून ब्रह्मपुत्रेचा प्रवाह काळा झाल्याच्या समस्येकडे लक्ष वेधले होते. पूर्वी असे दिसून आले नव्हते, असे त्यांनी लिहिले. हिवाळ्यात नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याने लोकप्रतिनिधीने केंद्राचे लक्ष वेधले.  

 

चीन ६०० किमी भुयार बांधत असल्याने साशंकता 

युन्नान प्रदेशात चीन ६०० किमीचे भुयार बांधत असल्याने सिआंग नदीचा प्रवाह वळता करण्याची शक्यता यापूर्वीही वर्तवण्यात आली होती. खासदार इरिंग यांनी याचा उल्लेखही पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात केला आहे. शेजारी देश असा कोणताही प्रकल्प सुरू नसल्याचे म्हणत असला तरीही अरुणाचल प्रदेशात लोकप्रतिनिधी याविषयी साशंक आहेत. ताकलामाकन वाळवंटातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चीन असे करू शकतो, असे अरुणाचलमधील काही नेत्यांना वाटते. गेल्या दोन महिन्यांपासून सिआंग नदीचा प्रवाह गढूळ दिसून येत असल्याचा दावा अरुणाचलच्या लोकप्रतिनिधीने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...