आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या नेत्यांनी नेहमी गप्प राहण्यास सांगितले, नवज्योत कौर सिद्धू यांचा पत्रपरिषदेत आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - मी जेव्हा जेव्हा शिरोमणी अकाली दलाच्या विरोेधात आवाज उठवला तेव्हा प्रत्येक वेळी भाजपच्या नेत्यांनी मला गप्प राहण्यास सांगितले, पक्षाचे नेते कधीही माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत, असा आरोप भाजपमधून बाहेर पडलेल्या आमदार नवज्योेत कौर सिद्धू यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला. त्यांनी शनिवारीच पक्षाचा राजीनामा दिला होता. अमृतसरमधील विकास प्रकल्पांवरून नवज्योत कौर यांचा नेहमीच शिरोमणी अकाली दल-भाजप सरकारशी वाद होत होता.
अकाली दलाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून भाजप कार्यकर्त्यांचा छळ केला जात होता तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत नेते जगदीश गगनेजा हे अकाली दलाशी युती सुरू ठेवण्याच्या विरोधात होते, असा दावा करून नवज्योत कौर म्हणाल्या की, मी आमदारपदाचा राजीनामा देणार नाही. अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातील विकासकामे सुरूच ठेवणार आहे. चुकीच्या कामांबद्दल आवाज उठवण्याचा विचार मी नेहमीच करत असे. मी मतदारसंघासाठी निधी मागितला तेव्हा त्याला नकार देण्यात आला. राजकारणात असे होतच असते असे मला सांगण्यात आले. त्यांनी मला तोंड बंद ठेवण्यास सांगितले. आणि निधी लवकरच देण्याचे आश्वासन दिले. चुकीचे काही घडत असेल तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही, राज्यात आपली युती आहे, तुम्ही युतीविरोधात बोलू नये, असे मला सांगण्यात आले. अकाली दलाच्या सांगण्यावरून ९९ टक्के भाजप कार्यकर्त्यांचा छळ होत आहे. त्यांच्या तक्रारी कोणीही ऐकून घेत नाही. काही चुकीचे घडत असले तरी तोंड गप्प ठेवणे हाच आघाडीचा धर्म असे आम्हाला सांगण्यात आले. तुम्ही फक्त पाहा, माफियांना पाठिंबा द्या, पण आवाज उठवू नका, असे सांगितले गेले, अशी टीकाही त्यांनी केली. अलीकडेच गोव्यातही संघाच्या विरोधात सूर दिसून आला होता.
बातम्या आणखी आहेत...