आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आवाज- ए- पंजाब’: पत्नी मंत्री, मी 'आप'ला शोपीस; सिद्धूने खोलली केजरीवालांची पोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- भाजपचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी अखेर पंजाबच्या राजकारणात ‘आवाज- ए- पंजाब’ नावाची नवी आघाडी उघडली. गुरुवारी त्याची घोषणा करतानाच त्यांनी अकाली- भाजप सरकार, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर घणाघाती टीका केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यांच्या टीकेचे प्रमुख लक्ष्य होते.

केजरीवाल माझ्या पत्नीला मंत्रिपद देऊन मला शोपीस म्हणून ठेवू पाहत होते. त्यांच्या नियतीमध्ये खोट आहे. त्यांचे नाव मोठे आणि लक्षण खोटे असल्याचा आरोप त्यांनी केला.
केजरीवालांनी ट्विट करून अर्धसत्य सांगितले. मी पूर्ण सत्य सांगतो, असे म्हणत सिद्धू म्हणाले की, केजरीवालांनी मला फक्त प्रचार करायला सांगितले. त्यांना मला शोपीस बनवून ठेवायचे होते. पण मला ते मान्य नव्हते.

सिद्धू म्हणाले, आपची ऑफर मिळाल्यानंतर त्यांना भेटायला गेलो. पक्षात माझी भूमिका काय असेल? असे विचारल्यावर तुम्ही निवडणूक लढवू नका. तुमच्या पत्नीला मंत्रिपद देऊ, असे ते म्हणाले, असा शोपीस तर मी भाजपमध्येही नव्हतो.
बातम्या आणखी आहेत...