आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयएनएस चेन्नईचे जलावतरण; नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील सर्वात मोठी लढाऊ नौका आयएनएस चेन्नई सोमवारी नौदलात दाखल झाली. कोलकाता क्लासचे हे लढाऊ जहाज संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुंबईत एका कार्यक्रमात देशाला समर्पित केले. यावेळी नौदलप्रमुख अॅडमिरल सुनाल लांबा हेही उपस्थित होते.
जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असलेल्या या लढाऊ नौकेत अनेक वैशिष्ट्ये आहेत. जमिनीवरून हवेत मारा करणारे बराक-८ हे क्षेपणास्त्रही तिच्यावर तैनात असेल. तिची लांबी १६४ मीटर आणि वजन ७५०० टन आहे. भारताच्या ताफ्यातील सर्वात मोठ्या लढाऊ नौकांपैकी ही एक आहे. आणखी काही चाचण्या पूर्ण केल्यानंतर ती पश्चिम कमांडमध्ये सहभागी केली जाईल.

भारतीय तंत्रज्ञानाने निर्मित या नौकेची बांधणी माझगाव बंदरात झाली. या श्रणीतील पहिले लढाऊ जहाज आयएनएस कोलकाता १६ ऑगस्ट २०१४ रोजी नौदलात सहभागी झाले होते. नंतर आयएनएस कोची ३० सप्टेंबर २०१४ रोजी नौदलात सामील झाले. २०२७ पर्यंत नौदल अशी २०० लढाऊ जहाज तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे.

60 टक्के निर्मिती स्वदेशी तंत्रज्ञानाने
- स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केलेले सर्वात मोठे लढाऊ जहाज. ६० टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर.
- सुपरसॉनिक ब्राह्मोस आणि बराक-८ क्षेपणास्त्रे तैनात. इस्रायल आणि रशियावरून मागवले सेन्सर तंत्रज्ञान.
- क्षेपणास्त्रविरोधी ‘कवच’ आणि टॉरपिडोविरोधी ‘मारिच’ डिकॉयद्वारे क्षेपणास्त्रांना भेदण्याची क्षमता.
- दोन आधुनिक हेलिकॉप्टरही घेऊन जाण्याची क्षमता.
- १६४ मीटर लांब, वजन ७५०० टन. ३० नॉटचा सर्वाधिक वेग.
पुढे वाचा, पृथ्वी-२ ची यशस्वी चाचणी...
बातम्या आणखी आहेत...