आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navy Vessel Submerged Near Vishakhapatnam One Killed, 4 Missing

नौदलाचे जहाज बुडाले; एकाचा मृत्यू, ४ बेपत्ता, विशाखापट्टणमजवळील दुर्घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखापट्टणम - नौदलामध्ये पुन्हा एकदा दुर्घटना झाली आहे. विशाखापट्टणम बंदरानजीक गुरुवारी रात्री एका जहाजात पाणी शिरल्यामुळे ते बुडाले. यामध्ये एका नौसैनिकाचा मृत्यू झाला, तर २३ जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. चार जवान बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते.

गुरुवारी रात्री आठ वाजता बंदरापासून १५ किमी अंतरावर ही दुर्घटना झाली. बुडालेल्या जहाजाचे नाव अस्त्रवाहिनी ए-७२ असल्याचे सांगण्यात येते. जहाजास टॉरपिडो रिकव्हरी व्हेसल नावाने ओळखले जाते. मोठ्या जहाजांतून डागण्यात आलेली लहान डमी क्षेपणास्त्रे मिळवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. या जहाजावर २८ नौसैनिक तैनात होते.नौदलाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले की, जहाज नियमित सराव कार्यक्रमात सामील होते. त्यामध्ये चार कंपार्टमेंट होते. एका कंपार्टमेंटमध्ये वेगाने पाणी घुसल्यामुळे जहाज बुडाले. बचाव मोहिमेदरम्यान एका चालकाचा मृत्यू झाला. जहाजात पाणी शिरण्यामागचे कारण समजू शकले नाही. जहाज २३ मीटर लांब व ६.५ मीटर रुंद होते. गोवा शिपयार्डमध्ये त्याची १९८३ मध्ये बांधणी करण्यात आली होती.

आठवड्यातील दुसरी, १४ महिन्यांतील चौदावी घटना
- ३१ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणमपासून ३०० सागरी मैल अंतरावर नौदलाच्या जहाजास आयएनएस कोराच्या एका मालवाहू जहाजाशी धडक बसली होती. अपघात मोठा झाला असता तर जहाजावर तैनात १६ क्षेपणास्त्राचे नुकसान झाले असते.
- नौदलाचे जहाज व पाणबुड्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत अनेक दुर्घटना झाल्या आहेत. याची सुरुवात ऑगस्ट २०१३ मध्ये झाली. आयएनएस सिंधुरक्षकच्या स्फोटात १८ जवानांचा मृत्यू झाला होता.
- यानंतर दहावी घटना २६ फेब्रुवारी रोजी पाणबुडी आयएनएस सिंधुरत्नबाबत झाली होती. यात पाणबुडीला आग लागल्यामुळे दोन नौदल जवानांचा मृत्यू झाला होता.
- या दुर्घटनेनंतर तत्कालीन नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल डी.के. जोशी यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर अ‍ॅडमिरल रॉबिन धोवन नौदलाचे प्रमुख झाले होते. अ‍ॅडमिरल जोशी यांच्या राजीनाम्यानंतरची ही चौथी दुर्घटना आहे.