आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नौदलाचे विमान गोव्याजवळ कोसळले, दोन अधिकारी बेपत्ता, एकाला बचावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - भारतीय नौदलाचे एक विमान काल रात्री गोव्याजवळ कोसळल्याची माहिती मिळाली असून या अपघातानंतर नौदलाचे दोन अधिकारीही बेपत्ता झाले आहेत. दक्षिण गोव्यापासून 2 नॉटिकल माईल्स अंतरावर हे विमान कोसळल्याची माहिती मिळाली आहे. नौदलाचे हे विमान रुटीन ट्रेनिंग मिशनवर होते. अपघात झाला त्यावेळी िवमानात नौदलाचे तीन जण होते.
(छायाचित्र संग्रहित)

या अपघातानंतर विमानातील एका जणाची सुटका करण्यात आली आहे मात्र दोन अधिकारी अद्यापही बेपत्ता आहेत. या दोन अधिकाऱ्यांमध्ये एक कॅप्टन आणि एक ऑब्झर्वर यांचा समावेश आहे. या विमानाबरोबर अखेरचा संपर्क काल रात्री 10.08 वाजता झाल्याची माहिती मिळाली आहे. विमानाचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली जात आहे. या जवानांचा शोध घेण्यासाठी सहा युद्धनौका आणि काही विमानांची मदत घेतली जात आहे.