आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला धमकीचे पत्र, पठाणकोटमधील एका गावात आढळला पाकिस्तानचा फुगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट/लाहोर - पाकिस्तानच्या सीमेजवळील दीनानगरातील कुंडे केसल आणि पठानकोटमधील बमियालमध्ये दोन फुगे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. फुग्यांमध्ये एक- एक पत्रही मिळाले आहे. त्याद्वारे भारताला धमकी‍ देण्यात आली‍ आहे. भारत पाकिस्तानविरोधात कधी युद्ध करणार नाही, अशा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे.

मिळालेली माहिती अशी की, दीनानगरमधील कुंडे केसल गावात आढळलेल्या फुग्यात एक पत्र मिळाले आहे. हे पत्र उर्दु भाषेत आहे. गावकरी नंबरदार चन्नण सिंह यांनी सांगितले की, फुगा आढळून आल्याची तत्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली.

'मोदी सुन लें, अयूबी की तलवारें अभी हमारे पास हैं-सैयद सलाहूद्दीन' असा उर्दु भाषेत मोदींना इशारा देण्यात आला आहे. एसएचओ कुलविंद्र सिंह यांनी सांगितले की, या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली आहे.

पठाणकोटमधील बमियाल येथील जसपाल भप्पी आणि राजेश कुमार यांनाही एक फुगा आढळून आला. त्यातही एक पत्र सापडले. त्यात लिहिले आहे की, 'मोदी सरकार सुने ले, इंडिया कभी जंग नहीं लड़ सकता-पाकिस्तानी अवाम'

एसएचओ रमेश कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान यापूर्वी देखील बॉर्डरवर पाकिस्तानी फुगे आणि कबूतर आढळून आल्याची घटना घडल्या आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, 'सर्जिकल स्ट्राइक'मुळे नवाझ शरीफ यांची डोकेदुखी वाढली
बातम्या आणखी आहेत...