आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी छत्तीसगडमध्ये नक्षलींचा पोलिसांवर हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
रायपूर (छत्तीसगड) - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छत्तीसगड दौऱ्याच्या चार दिवस आधी नक्षलवाद्यांनी आज (मंगळवार) भू-सुरुंग स्फोट घडवून पोलिस पथकाला लक्ष्य केले. या स्फोटात जीवित हानीचे वृत्त नाही. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आज सकाळी बीजापूर जिल्ह्यातील माटवाडा पोलिस स्टेशनचे एक पथक रस्ता उद्घाटनासाठी रवाना झाले. मात्र नक्षलवाद्यांनी जंगलात त्यांच्यासाठी सापळा रचून ठेवला होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 येथून पोलिस पथक जात असताना चार भू-सुरुंगांचा स्फोट घडवून आणण्यात आला.
असाच स्फोट उडिसामधील मलकानगिरी जिल्ह्यातील बोडीगुडा गावात देखील झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मे रोजी छत्तीसगड दौऱ्यावर जाणार आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचा त्यांच्या हा छत्तीसगडचा पहिला दौरा आहे. दंडकारण्य स्पेशल झोनल कमेटीने पत्रक प्रसिद्ध करुन पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा आवाहान केले आहे.