आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सशस्त्र नक्षलींकडून घातपात; एसपी बलिहारसह सहा जवान शहिद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकूड/रांची- नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मंगळवारी झारखंडमधील पाकूड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अमरजित बलिहार व पाच पोलिस शहीद झाले. दोन जखमी जवान रुग्णालयात दाखल आहेत.

पोलिस महानिरीक्षक प्रिया दुबे यांच्यासोबतची बैठक आटोपून बलिहार दुमकाहून परतत होते. काठीकुंडच्या अमरापार जंगलाजवळ 50 ते 60 सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्यांना घेरून गोळीबार केला. गोळीबारानंतर पोलिसांजवळील शस्त्रे हिसकावून घेऊन नक्षलवादी फरार झाले. हल्ला झाला तो भाग नक्षलवाद्यांचा वावर नसलेला मानला जातो.

हल्ला कोठे आणि कसा
>दुमकाहून परतताना काठीकुंडनजीक जमनी व अमतल्ला गावादरम्यान पुलावर नक्षली दबा धरून बसले.
> एसपींची स्कॉर्पिओ व सुरक्षा रक्षकांच्या बोलेरोची गती पुलाजवळ कमी झाली. तेव्हा नक्षलींनी गोळीबार केला.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या पाकूड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अमरजित बलिहार यांच्या ताफ्यावर भाकप माओवादी संघटनेच्या सदस्यांनी काल (मंगळवार) हल्ला केला. त्यात पोलिस अधीक्षक अमरजित बलिहार व पाच पोलिस शहीद झाले. तसेच दोन जखमी जवान झाले. काठीकुंड मधील डुमरा येथे ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी आधीच हल्ल्याची तयारी केलेली होती. घटनास्थळावरून सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

या संदर्भात अनिल श्रीवास्तव म्हणाले, की पोलिस अधिक्षक बलिहार यांच्या ताफ्यात दोन गाड्या होत्या. त्या नक्षलवाद्यांनी स्फोटकांच्या मदतीने उडवून दिल्या. त्यानंतर दाट जंगलामधून नक्षलवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देत पोलिसांकडूनही गोळीबार करण्यात आला.

उप महानिरिक्षकांसोबतच्या बैठकीहून परतत होते बलिहार
उप महानिरिक्षक प्रिया दुबे यांच्यासोबत असलेली बैठक आटोपून बलिहार परतत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. साधारण 2.30 वाजता बैठक संपली होती. संथाल परगण्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे.

बलिहार यांची नुकतीच पदोन्नती करण्यात आली होती. त्यांना आयपीएस रँक देण्यात आली होती. पाकूड येथे नुकतीच त्यांची पोलिस अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली होती. या पूर्वी ते रांची येथे नोकरीला होते.