आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांचे क्रौर्य; पहिले शिर केले धडावेगळे मग, शरीराचे केले दोन तुकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची/गुमला - झारखंड राज्यातील नक्षलप्रभावीत गुमला जिल्ह्यातील पीपील लिबरेशन फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएलएफआय) नक्षलवाद्यांनी शुक्रवारी रात्री जगरनाथ टाना भगत (26) याला वृंदा गावातील मुख्य रस्त्यावर बोलावून त्याची हत्या केली. कुलबीर जगटोली गावचा रहिवासी जगरनाथ याचे शिर धडापासून वेगळे केल्यानंतर त्याच्या शरीराचे दोन भाग करण्यात आले. शनिवारी सकाळी रस्त्यावर पडलेले मृतदेहाचे तीन भाग पाहून स्थानिक चक्रावून गेले. त्यानंतर हत्येची बातमी वा-यासारखी पसरली. रस्त्यावरील चित्र पाहून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

ग्रामस्थांनी घटनेची माहिती तत्काळ गुमला पोलिस स्टेशनला दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी दिपक पांडे, पोलिस उपनिरीक्षक कैलाश करमाली, निरीक्षक आमिश हुसैन, ठाणे अंमलदार निरंजन तिवारी यांच्यासह मोठो फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. त्यांनी या हत्येचा तपास सुरु केला आहे.

जगरनाथ वृंदा गावात सास-यांच्या घरी राहात असल्याची माहिती त्याचा भाऊ बुद्धराम टाना भगत याने दिली. तो कधी कधी कुलबीर जोगीटोली येथेही येत होता. शुक्रवारी तो वृंदा येथेच होता. शनिवारी सकाळी त्याचा मेव्हणा अनिल याने फोन करुन हत्येची माहिती दिली. अनिल म्हणाला की, रात्री पाच-सहा नक्षलवादी आले होते. ते जबरदस्तीने जगरनाथला सोबत घेऊन गेले. त्यानंतर सकाळी कळाले की, त्याची हत्या करण्यात आली आहे.