आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवादी अटकेत तर महिलेचे आत्मसमर्पण; मार्च 14 मध्ये हल्ल्याच्या कटात होती कमांडर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - पोलिसांनी एका नक्षलवाद्यास पकडले तर नक्षलवादी महिलेने छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात पोलिसांसमोर रविवारी आत्मसमर्पण केले. या दोन्ही नक्षलवाद्यांवर रोख इनाम जाहीर झालेेले होते. राजू मंडावी (२८) हा माओवादी संघटनेत सक्रिय सदस्य होता.  बरसूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस पथकाने त्याला अटक केली.  एका ज्येष्ठ नक्षलवादी कमांडरचा राजू अंगरक्षक म्हणून काम करत होता. मे महिन्यात हा कमांडर पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. राजूवर एक लाख रुपयांचे इनाम होते. माओवाद्यांनी पोलिस पथकावर  आणि स्थानिक गावकऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात राजू मंडावी याचा सहभाग होता.  
 
दुसऱ्या एका प्रकरणात श्यामला सोधी (२७) या माओवादी कमांडरने दंतेवाडा जिल्हा पोलिस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केले. ती सुकमा येथील किस्ताराम परिसरातील रहिवासी होती. तिने मार्क्सवादी (माओवादी) या बंदी घातलेल्या पक्षात २००८ मध्ये प्रवेश केला. ती स्थानिक संघटनेच्या पथकाची कमांडर होती.
 
मार्च २०१४ मध्ये सुकमा जिल्ह्यातील तहकवाडा येथे झालेल्या नक्षलवाद्यांच्या मोठ्या हल्ल्यात तिचा सक्रिय सहभाग होता. या हल्ल्यात १५ सुरक्षा रक्षक आणि नागरिक ठार झाले होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक कमललोचन कश्यप यांनी दिली. श्यामलावर ५ लाखांचे इनाम होते.  नक्षलवादी चळवळीच्या पोकळ तत्त्वज्ञानामुळे तिचा भ्रमनिरास झाला असल्याची कबुली तिने दिली. या दोघांना तात्कालिक आर्थिक मदत म्हणून १० हजार रुपये दिले. शासकीय धोरणांनुसार त्यांचे पुनर्वसनही केले जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...