आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या, मोदी यांच्या सभेच्या विरोधात २५० ओलिसांची मुक्तता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगडमधील सभेच्या विरोधात नक्षलींनी शनिवारी रात्री ओलीस ठेवलेल्या २५० ग्रामस्थांची मुक्तता केली, पण पुलाचा सुपरवायझर सदाराम नाग याची हत्या केली. नक्षलींनी शुक्रवारी रात्री सुकमा जिल्ह्यात ग्रामस्थांना ओलीस ठेवले होते. मोदींनी जवळच्याच दंतेवाडा जिल्ह्यात सभा घेतली. या भागात ३० वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधानांनी सभेला संबोधित केले.

सुकमाचे पोलिस अधीक्षक डी. श्रवण म्हणाले, नक्षलींनी गादीम व मुंगा गावादरम्यान लोकअदालत लावली होती. तीत त्यांनी सदारामची हत्या केली. ओलीस ग्रामस्थ त्याचा मृतदेह घेऊन आले. सदाराम मारेंग गावच्या नदीवरील प्रस्तावित पुलाचा सुपरवायझर होता. नक्षलींचा या पुलाला विरोध होता. टहाकवाडा व मारेंगच्या लाेकांना नक्षलींनी ओलीस ठेवले होते.