आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

160 जवानांचे सुरक्षा कडे भेदून कुख्यात नक्षलवाद्यांचे पलायन, छत्तीसगडमधील दंतेवाड्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
दंतेवाडा - छत्तीसगडच्या दंतेवाडातील नहाडी-हिडम-गुमोडीच्या जंगलात गुरुवारी दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांच्या गडात घुसून मोठी कारवाई पार पाडली. यात नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला; पण नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. यात दरभा क्षेत्रातील चैतू, देवा, जगदीश, श्याम या कुख्यात नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
 
त्यांना पकडण्यासाठी डीआरजी आणि एसटीएफच्या १६० जवानांनी नक्षलवाद्यांच्या आजूबाजूने इंग्रजी बाराखडीतील ‘यू’ आकारात घेराव घातला होता. तब्बल ८ तासांपर्यंत याच पद्धतीने त्यांनी नक्षलवाद्यांचा पाठलाग केला. त्यांच्यामागे सीआरपीएफची अतिरिक्त कुमकही जंगलात तैनात होती.  गोळीबाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले, पण दोघांना कंठस्नान घातल्याचा सुरक्षा दलांचा दावा आहे. हे ठिकाण नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती अड्डा होता. सुरक्षा दलाने मात्र तो उद्ध्वस्त करून टाकला. ही सुरक्षा दलाची मोठी कारवाई मानली जात आहे. या मोहिमेत सहभागी जवानांशी शुक्रवारी सीआरपीएफ आणि पोलिसांनी चर्चा करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आणि पुढील वेळी आणखी सतर्कता बाळगण्याचा सल्लाही दिला.  

सीआयएसएफचा लुटलेला शस्त्रसाठा सापडला  
काही वर्षांपूर्वी छत्तीसगड राज्यातील बचेली भागातील सीआयएसएफ तळावरून नक्षलवाद्यांनी लुटून नेलेला शस्त्रसाठा या ठिकाणी सापडला. यात पाइप, एचई, पॅराबॉम्ब, हातबॉम्ब, क्लेमोर माइन्स, जिलेटिन, बंदुकांचे ट्रिगर, वायर, बारूद यासह अनेक स्फोटके तसेच शस्त्रसाठा सापडला.  

गोंडी भाषेतील पत्र, पुस्तके आढळली : उद्ध्वस्त करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांच्या अड्ड्यावरून  पोलिसांनी तसेच सुरक्षा दलाने गोंडी व हिंदी भाषेतील नोट्स, पत्र आणि पुस्तके जप्त केली आहेत. गोंडी भाषेतील पुस्तकांचे अनुवाद करण्याचे काम या भागाचे पोलिस अधीक्षक कमलोचन कश्यप आणि उपअधीक्षक गोरखनाथ बघेल स्वत: करत आहेत, तर येथे सापडलेल्या औषधींचे परीक्षण एएसपी डॉ. अभिषेक पल्लव करत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...