आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naxalites Attacked STF In Zeeram Ghati Area On Friday Night

गस्तीवर निघालेल्या जवानांवर नक्षलींचा हल्ला, महामार्गावरील स्फोटात 1 शहीद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नक्षलवाद्यांनी घडवून आणलेला स्फोट एवढा भयंकर होता की, रस्त्यावर जवळपास पाच फुटांचा एक खड्डा तयार झाला. - Divya Marathi
नक्षलवाद्यांनी घडवून आणलेला स्फोट एवढा भयंकर होता की, रस्त्यावर जवळपास पाच फुटांचा एक खड्डा तयार झाला.
रायपूर - छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित झीरम घाटी परिसरात नक्षलवाद्यांनी शुक्रवारी रात्री उशीरा गस्त घालण्यासाठी निघालेल्या एसटीएफ जवानांना लक्ष्य केले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नक्षलवाद्यांनी एक मोठा स्फोट घडवून आणला. या स्फोटात एक जवान शहीद झाला, तर दोघे जखमी झाले आहेत.

पाच फूट खोल खड्डा तयार झाला
हा स्फोट एवढा भीषण होता की, रस्त्यावर सुमारे पाच फुटांचा खड्डा तयार झाला. स्फोटानंतर जवळपास लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबाल सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तरात फायरिंग केली. जवानों आणि नक्षलींमध्ये रात्री 2 वाजेपासून चार वाजेपर्यंत चकमक चालली.त्यानंतर नक्षलवादी फरार झाले. हल्ल्यात एसटीएफचा प्लाटून कमांडर कृष्ण प्रताप सिंह शहीद झाले. ते मध्यप्रदेशच्या भिंड येथील रहिवासी होते. त्यांचे वडील आर्मीतून निवृत्त झाले आहेत. तर लहान भाऊ आर्मीत असून लैहमध्ये तैनात आहे.

मोठी घटना टळली...
झीरम घाटी हा परिसरा नक्षलवाद्यांचा गड मानला जातो. त्यामुळे या परिसरातून जाताना जवान अधिक काळजी घेत असतात. रात्रीच्या घटनेतही ब्लास्टनंतर जवान लगेचच अलर्ट झाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवानांना सावरायला आणखी थोडा वेळ लागला अशता तर मोठी दुर्घटना झाली असती. झीरममध्येच मे 2013 मध्ये नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात 30 पेक्षा अधिक नेत्यांचा मृत्यू झाला होता. मार्च 2014 मध्येही नक्षलींनी गस्त घालण्यासाठी निगालेल्या जवानांवर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 15 जवान शहीद झाले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS