आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांनी रेल्वेमार्ग उखडला; छत्तीसगडच्या कामालूर रेल्वेस्थानकाची घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दंतेवाडा- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी सोमवारी रेल्वेमार्ग उखडून टाकले. त्यामुळे ओएचई (अोव्हरहेड इक्विपमेंट व्हॅन) उलटली. या अपघातात रेल्वे कर्मचारी किरकोळ जखमी झाले. नक्षलवादी कर्मचाऱ्यांचे मोबाइल व वॉकी-टॉकी घेऊन फरार झाले. घटना बस्तरजवळील दंतेवाडा जिल्ह्यातील भांसी व कामालूर रेल्वेस्थानकांदरम्यानची आहे.   

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी १२ रेल्वे कर्मचारी ओएचई व्हॅनने दुरुस्तीसाठी भांसी येथे आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ६.४० वाजता त्याच ओएचई व्हॅनने भांसीहून दंतेवाड्यास जाण्यासाठी निघाले. ३ किमी पुढे गेल्यानंतर सुमारे २०० नक्षलवादी रेल्वेमार्ग उखडत होते. पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावले. पण व्हॅन त्या ठिकाणी रेल्वेमार्गावरून खाली घसरली. रेल्वे कर्मचारी किरकोळ जखमी झाले. नक्षलवाद्यांनी व्हॅनला घेरले आणि कर्मचाऱ्यांच्या जवळील वॉकी-टॉकी व मोबाइल हिसकावून पळून गेेले.  

बिजापूर येथे एक नक्षलवादी ठार, एके ४७ जप्त
बिजापूर वाघसंरक्षित भागात पोलिसांनी केलेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. त्याच्याजवळील एके-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी  सांगितले, आठवडाभरापूर्वी वाघसंरक्षित भागात आम्ही शोधमोहीम चालवली होती. कोब्रा आणि एसटीएफचे पथक गरतुलमार्गे मुकावेलीला पोहोचले. तेथे जवान आणि नक्षलवाद्यांशी चकमक झाली.
बातम्या आणखी आहेत...