आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NC, BJP Workers Clash After Amit Shah Visits Border Camps

अमित शहा काश्मीर दौर्‍यावर, मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांच्या समर्थकांशी भाजपचा संघर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौर्‍यावर आहेत. त्यांच्या दौर्‍याला जम्मू-काश्मीरमधील पक्षांनी विरोध केला आहे. अमित शहा आरएसपूरा सेक्टरच्या दौर्‍यावर असताना नॅशनल काँन्फ्रन्सचे नेते तरनजीतसिंह यांनी त्यांच्या विरोधात निदर्शने केली. तर, पँथर पार्टीच्या आमदारांनी सीमावर्ती भागातील गावांमध्ये शहांच्या दौर्‍याला विरोध करत विधानसभेतून सभात्याग केला.
नॅशनल काँन्फ्रन्स आणि भाजप समर्थक भिडले
भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा, महासचिव राम माधव आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह सीमावर्ती भागातील शरणार्थींच्या शिबारात गेले होते. त्यांनी तिथे शरणार्थींसोबत चर्चा केली. त्याच वेळी नॅशनल काँन्फ्रन्सचे नेते तरनजीतसिंह समर्थकांसह दाखल झाले आणि शहांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. शहा तेथून गेल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी तरनजीतसिंह यांच्यावर हल्ला केला. तिथे उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करुन परिस्थिती नियंत्रणात आणली.
शहांचे मिशन काश्मीर
अमित शहांच्या दौर्‍याचा उद्देश आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अधिकाधिक जागा विजयी करण्याचा आहे. त्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणणे गरजेचे आहे. काश्मीरसाठी भाजपने 'मिशन 44' ही योजना आखली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेत बहुमत मिळवून सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा इरादा आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 19 जानेवारी 2015 रोजी संपणार आहे. पुढील वर्षी येथे विधानसभेच्या 87 जागांसाठी निवडणूक होईल.

छायाचित्र - रविवारी शहा यांचे जम्मूत आगमन झाले तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले.