आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूखंडाबाबतचा निर्णय सामूहिक, मला एकट्यालाच का गुंतवले?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - मुंबई विद्यापीठातील काेट्यवधी रुपयांचा भूखंड विकासकाला परस्पर दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ‘एसीबी’वर अागपाखड केली अाहे. ‘जमीन देण्याचा निर्णय सामूहिक असताना मला एकट्यालाच या प्रकरणात का गुंतवले जात अाहे?’ असा सवाल करून भुजबळांनी ‘एसीबी’ची भावना ठीक नसल्याची टीका केली अाहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय शिबिरासाठी भुजबळ पाटण्यात अाले अाहेत. त्या वेळी माध्यमांशी बाेलताना भुजबळांनी आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगितले. मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत ते म्हणाले, ‘सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागा ‘बीओटी’ तत्त्वावर देण्याचा िनर्णय काही माझा एकट्याचा नव्हता. मंत्रिमंडळ उपसमितीने तो िनर्णय घेतला होता अाणि त्याला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली होती.
ही मान्यता देण्यापूर्वी सर्व िवभागांच्या प्रधान सचिवांनीही बांधकाम िवभागाच्या जागा बीओटी तत्त्वावर देण्यासाठी िहरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे ही सारी िनर्णय प्रक्रिया माझी एकट्याची होऊ शकत नाही. ती सामूहिक जबाबदारी होती. मात्र, सरकार बदलल्यानंतर एसीबीकडून यासाठी मलाच दोषी ठरवले जात असेल तर एकूणच त्यांच्या भूमिकेबद्दल शंका वाटावी अशीच एकूण चौकशी िदसते, असे स्पष्टीकरण भुजबळ यांंनी िदले. दरम्यान, पक्षांध्यक्ष शरद पवार यांनीही भुजबळांची पाठराखण
केली आहे.
बातम्या आणखी आहेत...