आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीश-लालूंच्या मोदींविरोधी आघाडीत शरद पवारही सामील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार विधानसभेची आगामी निवडणूक ही देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरेल, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मोदींिवरोधातील आघाडीत सामील होण्याचा िनर्णय घेतला आहे. विधान परिषदेत राष्ट्रवादीला एक जागा देत नितीशकुमारांनी एक पाऊल टाकल्यानंतर विधानसभा निवडणुकीत नितीशकुमारांच्या आघाडीत सामील होत भाजपविरोधात पवार पावले उचलत असल्याचे स्पष्ट झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे येथे दाेन िदवसांचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले असून या निमित्ताने त्यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाची ताकद आजमावणे सुरू केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीला आणखी चारएक महिने असले तरी काही िदवसांनी िबहार िवधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुका होत आहेत. यापैकी ३ जागा नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेडला, ३ जागा लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला, ३ जागा काँग्रेसला, तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचा िनर्णय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बिहारचे एकमेव खासदार तारिक अन्वर यांच्याकडे पवारांनी बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. तारिक हे िनतीश तसेच लालू यांच्याशी संपर्क साधून आहेत. िबहारमध्ये राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही; पण तारिक अन्वर यांच्यामुळे िबहारच्या दोन िजल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी आपले अस्तित्व िटकवून आहे. याची कल्पना िनतीशकुमार यांना आहे. शिवाय धर्मनिरपेक्ष आघाडीचे नेहमीच समर्थन असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीत निश्चितच चांगल्या जागा दिल्या जातील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

प्रश्न हिंदीतच विचारा, अन्यथा नको : पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय शिबिर असल्याने महाराष्ट्रातून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने पाटण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा मूळ पाया हा महाराष्ट्राचा असल्याने या पक्षाच्या एकूण परिस्थितीविषयी एका पत्रकाराने त्यांना मराठीत प्रश्न िवचारला असता ते म्हणाले, प्रश्न िवचारायचा असेल तर िहंदीत िवचारा, अन्यथा िवचारू नका. पवारांच्या या मराठीविरोधी भूमिकेमुळे मराठी भाषिक पत्रकारांना मोठा धक्का बसला. अधिवेशन महाराष्ट्राबाहेर असल्याने पवार असे बोल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांचे म्हणणे होते.

भुजबळांिवरोधात सरकारचे षड््यंत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सध्या विविध आरोपांखालील चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. यावर पवार म्हणाले, भुजबळांिवरोधात फडणवीस सरकारने षड््यंत्र रचले आहे. त्यांना जाणूनबुजून अडकवले जात आहे. मात्र या चौकशीतून सत्य काय ते लवकरच बाहेर येईल. या वेळी सरकार तोंडघशी पडल्यावाचून राहणार नाही.

राष्ट्रवादी विलीन होणार नाही!
राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद महाराष्ट्रापुरती मर्यादित असून राष्ट्रीय पक्ष म्हणून या पक्षाला मर्यादा येत आहेत, या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील होणार का, असा प्रश्न िवचारला असता पवार म्हणाले, काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच नाही. आमची ताकद खूप मोठी नसली तरी आमचे स्वत:चे छाेटेसे का हाेईना अस्तित्व आहे आणि ते आम्ही गमावणार नाही.