आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींकडून विकास नव्हे, विश्वासघात , शरद पवारांचे भाजपवर टीकास्त्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - आघाडी सरकारच्या िवरोधात रान उठवून शेतकरी, कामगार, युवक, महिला, अल्पसंख्याकांना ‘अच्छे िदन’ दाखवण्याचा िवश्वास नरेंद्र मोदींनी दाखवला होता. पण पंतप्रधानपदी िवराजमान झाल्यानंतर त्यांनी लोकांचा िवकास नव्हे तर िवश्वासघात केला. एक वर्ष उलटून गेल्यानंतर या सर्वांच्या पदरी िनराशा आली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी प्रथमच मोदींवर जाहीरपणे टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पक्षाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर पवारांनी मार्गदर्शन केले. माेदींवर शरसंधान साधताना ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या िवकासासाठी मी कृषिमंत्री म्हणून सतत दहा वर्षे प्रयत्न केले. यामुळे देशात अन्नधान्यांचे िवक्रमी उत्पादन झाले. पण मोदी सरकार सत्तेवर येताच त्यांनी शेतकऱ्यांच्या िवकासाच्या पैशांना कात्री लावली. गेल्या वर्षी कृषी िवभागासाठी १९,८५२ कोटी मंजूर केले होते. मोदींनी ते १७,००० कोटींपर्यंत कमी केले. राष्ट्रीय िकसान िवकास परियोजनेतील िनधी ८४०० कोटींवरून ४५०० कोटींवर आणला. त्यांच्या अशा धोरणांमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे, असा अाराेप पवारांनी केला.
महाराष्ट्रात फक्त मराठवाड्यात ४५ िदवसांत ९३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र शेतकऱ्यांची बाजू घेण्याऐवजी मोदी सरकार आत्महत्यांच्या आकड्यांमध्ये फेरफार करण्यात गंुग आहेत. शेतजमिनी ताब्यात घेण्यासाठी भूसंपादन कायदा मंजूर करण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या तर शेतकरी रस्त्यावर उतरल्यािशवाय राहणार नाही, असा इशाराही पवार यांनी िदला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल शरद पवार यांचा पाटण्यात सत्कार करण्यात अाला. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, तारिक अन्वर अादींची व्यासपीठावर उपस्थिती हाेती.

अजितदादांची पाठ
माजीउपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिवेशनाकडे पाठ िफरवली. शरद पवारांनंतर दुसऱ्या क्रमांकाचा नेता असूनही इतक्या महत्त्वाच्या अधिवेशनाकडे ते िफरकल्याबद्दल चर्चा सुरू होती. छगन भुजबळ, िवजयसिंह मोहिते पाटील, जयंत पाटील यांच्यासह पहिल्या, दुसऱ्या तसेच ितसऱ्या फळीतील नेते पदाधिकारी पाटण्याला आले असताना अजितदादांना मात्र हे अधिवेशन महत्त्वाचे वाटले नाही का, अशी कुजबुज होती.


भुजबळांचा पत्ता कट
समतापरिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांनी ओबीसींचे मोठे संघटन िबहारमध्ये उभे केले होते. परिषदेच्या अधिवेशनाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहत. मात्र भुजबळ मोठे होत आहेत. हे पाहताच पवारांनी समता परिषदेला सर्वत्र सुरुंग कसा लागेल, याची तजवीज केली. आजही भुजबळांना मानणारा बहुजनांचा मोठा वर्ग िबहारमध्ये आहे. मात्र िबहार िवधानसभा निवडणुकीची सारी सूत्रे खासदार तारिक अन्वर यांच्या हाती देऊन पवारांनी िबहारमधून पुन्हा एकदा भुजबळांचा पत्ता कट केला.