आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठीतील फूड पार्क गुंडाळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघ अमेठीतील प्रस्तावित सर्वात मोठा फूड पार्क आता गुंडाळण्यात आला आहे. केंद्र सरकारने २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची ही योजना रद्द केली आहे. हा प्रकल्प गुंडाळण्यास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

अन्न प्रक्रियेसाठी विविध प्रकल्प सुरू करण्याची योजना होती. बिर्ला समूहाकडून त्यावर प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यासाठी स्थानिक कृषी उत्पादनांचा वापर करण्यात येणार होता. आंबा, मुरब्बा, सॉस इत्यादी उत्पादने तयार करण्याची योजना होती. यातून परिसरातील ४० हजार लोकांना रोजगार मिळणार होता. रायबरेली, फैजाबाद, लखनऊ, सुलतानपूर, प्रतापगडसह अमेठीच्या परिसरातील सुमारे २० जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना त्याचा सरळ लाभ मिळणार होता. ही योजना रद्द करण्यात येणार असल्याने त्याचा परिणाम ४० हजार शेतकर्‍यांवर होणार आहे, असा दावा काँग्रेसचे आमदार अखिलेश प्रताप सिंह यांनी केला आहे. त्यामुळेच काँग्रेस शेतकर्‍यांसाठी संघर्ष करेल.

२०१३ मध्ये भूमिपूजन
उद्योगपती आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांच्या हस्ते ऑक्टोबर २०१३ मध्ये या प्रकल्पासाठी भूमिपूजन करण्यात आले होते. तत्कालीन अन्न प्रक्रिया मंत्री चरणदास महंत व राहुल गांधी यांचीही उपस्थिती होती.

गॅस, वीज देण्यास नकार
हा प्रकल्प जगदीशपूरमध्ये प्रस्तावित होता. त्याची तयारी सुरू झाली होती. तो सुरू करण्यासाठी आवश्यक गॅस, वीजपुरवठा आणि इतर सुविधा मिळणार होत्या. परंतु मोदी सरकारने त्या देण्यास नकार दिला. त्यामुळे कंपनीला हा प्रकल्प बंद करण्यावाचून काही पर्यायच राहिला नाही.

जुलै २०१४ मध्ये मागवले प्रस्ताव
केंद्र सरकारने ३१ जुलै २०१४ रोजी मेगा फूड पार्क सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवले होते. त्यासाठी ७२ प्रस्ताव मिळाले होते. त्याशिवाय उत्तर प्रदेशातून २ प्रस्ताव मिळाले होते. एक प्रकल्प सर्व अटींची पूर्तता करत होता. त्यास मंजुरी मिळाली होती. तो मथुरेस होईल. अमेठीसाठी प्रस्ताव नव्हता. - एन. के. गायगी, संचालक, केंद्रीय अन्न प्रक्रिया, उद्योग मंत्रालय
बातम्या आणखी आहेत...