शेखावाटी - चायनीज मांजामुळे एका मुलाचा गळा कापल्याची घटना शेखावटी येथे घडली आहे. मुलाची तब्येत नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमी युवकावर सीकर येथील एसके रूग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
त्याचे झाले असे की, कस्बेच्या वार्ड सातमधील निवासी सुरेशकुमार सैनी (25) संध्याकाळी साधारण 6.30 च्या सुमारास बाइकवरून घरी जात असताना चाउनीज मांजा त्याच्या गळ्यात अडकला आणि त्याचा गळा कापला गेला. त्याला लगेच घटनास्थळी उपस्थित नागरीकांनी रूग्णालयात दाखल केले.
बेजवाबदारपणा
तीन दिवसांपूर्वी येथील कलेक्टर एलएन
सोनी यांनी चायनीज मांज्याच्या विक्रीवर बंदी घातली होती. पण विक्रि करणा-या व्यक्तींवर अधिका-यांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
धोका
काच लावण्यात आलेला हा मांजा शरीराच्या कोणत्याही भागास लागल्यास त्यावरील काचांचे बारीक तुकडे शरीरात जावू शकतात. चायनीज मांज्यामध्ये लोह्याचा अंश असतो. काचेची पॉलिश केल्यामुळे हा मांजा अधिक धारदार बनतो. तसेच यामध्ये केमिकलचा लेप असल्याने शरीरात उपचारानंतर इन्फेक्शन होण्याची भिती अधिक असते.
आयुष्य अनमोल आहे, चायनीज मांजापासून दूर राहा
चायनीज मांज्याचा वापर एखाद्या व्यक्तीसाठी जीवघेणा ठरू शकतो. तुमची एक छोटीशी चुक एखाद्या माणसाचे आयुष्य धोक्यात आणू शकते. त्यामुळे पतंग उडवताना चायनीज मांजाचा वापर करणे टाळा.