आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘नीट’मध्ये टॉप-३ रँकवर अॅलन इन्स्टिट्यूटचे वर्चस्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा - वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’मध्ये अॅलन करिअर इन्स्टिट्यूट, कोटाने घवघवीत यश मिळवले आहे. याशिवाय क्लासरूम विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय स्तरावर पहिल्या तीन रँकसह टॉप-१० मध्ये ७ स्थानांवर बाजी मारली. अॅलनच्या ३०,३९३ विद्यार्थ्यांनी काउन्सेलिंगपर्यंत मजल गाठली आहे. टॉप-१०० पैकी ५० विद्यार्थी अॅलनचे आहेत. या वर्षी जेईई अॅडव्हान्सच्या निकालांमध्येही अॅलनच्या क्लासरूम विद्यार्थ्यांनी एआयआर-१,२ व ३ स्थान मिळवले आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीयच्या मोठ्या परीक्षांमध्ये १ वर्षातच अखिल भारतीय स्तरावर पहिल्या तीन रँक मिळवणारी अॅलन देशातील एकमेव कोचिंग इन्स्टिट्यूट आहे.

संचालक बृजेश माहेश्वरी यांनी सांगितले की, नीटच्या निकालांमध्ये टॉप-१० मध्ये पहिली रँक संजय शहाने मिळवली. दुसऱ्या स्थानी एकांश गोयल, तिसऱ्या स्थानी निखिल बाजिया तर दहाव्या स्थानी उत्कर्ष आनंद आहे. हे सर्व कोटा क्लासरूमचे विद्यार्थी आहेत. टॉप १० मध्ये अशांक खेतान चौथ्या, द्युती शहा सहाव्या, जपनूर कौर सातव्या स्थानी असून ते डिस्टन्स लर्निंग प्रोग्राममध्ये आहेत. काउन्सेलिंगसाठी ३०,३९३ विद्यार्थी पात्र ठरले. २४,०५४ क्लासरूम कोचिंगचे असून ६,३३९ विद्यार्थी डीएलपीच्या माध्यमातून अॅलनशी संलग्न आहेत. टॉप ५० मध्ये ३२ विद्यार्थी असून २२ क्लासरूम आणि १० डीएलपीचे आहेत. नीट एआयआर-१ प्राप्त करणारा हेत शहा सांगतो की, यशासाठी आत्मविश्वास व नियमित अभ्यासाची गरज आहे. दुसऱ्या स्थानी असणारा एकांश गोयल सांगतो की, मी २ वर्षे सोशल साइट्सपासून दूर राहिलो.
बातम्या आणखी आहेत...