आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नीट’ची ओएमआर शीट जारी; आज आक्षेप नोंदवा, 26 जूनला निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर - सीबीएसईद्वारे आयोजित नीट २०१७ चे ओएमआर शीट मंगळवारी जारी करण्यात आले. या परीक्षेस बसलेले विद्यार्थी बुधवारी सायं. ५.०० वाजेपर्यंत आक्षेप नोंदवू शकतील. या परीक्षेची अॅन्सर की १५ जून रोजी जारी होईल. सीबीएसईची वेबसाइट http://cbseneet.nic.in वर क्लिक करून विद्यार्थी ओएमआर चॅलेंज ऑप्शनवर क्लिक करतील. यानंतर ओएमआर शीट पाहण्यासाठी आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड अपलोड करतील. यानंतर त्यांना ओएमआर शीट दिसेल.

परीक्षार्थी बुधवारी सायं ५.०० पर्यंत  Responses of the Questions देऊ शकतील. नीट यूजी २०१७ ची अॅन्सर की १५ रोजी जारी होईल. विद्यार्थी १६ जून रोजी सायं.  ५ वाजेपर्यंत आक्षेप नोंदवू शकतील. आक्षेपासाठी परीक्षार्थींना १००० रुपये शुल्क जमा करावे लागेल. याची पद्धतीही वेबसाइटवर दिली आहे.

२६ रोजी निकाल
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीएसई आता २६ जून रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. निकालाची देशभरात उत्सुकता आहे.
बातम्या आणखी आहेत...