आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या काँग्रेस आमदाराची कन्या या कारणामुळे सध्या आहे चर्चेत; जाणून घ्या नेहाची कहाणी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार)- बिहारमधील भागलपूरचे काँग्रेसचे आमदार अजीत शर्मा यांची कन्या नेहा शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अपकमिंग मूव्ही सॉन्गमुळे नेहा टॉकिंग पॉईंट बनली आहे. महत्त्वाचे म्हणजे, सॉग्जमध्ये ती वेस्टइंडीजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्रावो याच्यासोबत थिरकताना दिसत आहे. ब्रावोसोबत नेहाची केमिस्ट्री पाहाण्यासारखी आहे.

माध्यमिक शिक्षण भागलपूरमधून....
- 21 नोव्हेंबर, 1987 मध्ये जन्मलेली नेहा ही आमदार अजीत शर्मा यांनी धाकटी कन्या आहे.
- नेहाने माउंट कारमेल स्कूल, भागलपूरमधू माध्यमिक शिक्षण घेतले. नंतर तिने दिल्लीतील NIIFT मधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला.
- काही वर्षे फॅशन डिझायनर म्हणून काम केल्यानंतर तिला तेलुगु फिल्म 'चिरुथा'मध्ये ब्रेक मिळाला.
- ब्रावोसोबत दिसणार्‍या नेहाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

2010 मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री....
- नेहाने 2010 मध्ये बॉलीवूडमध्ये इम्रान हाशमीसोबत पदार्पण केले होते.
- अजीत शर्मा यांच्यासाठी नेहा इलेक्शन कॅम्पेनमध्ये देखील सहभागी झाली होती.
- नेहाने वडीलांचा खुल्या जीपमधून प्रचार केला होता. नेहाला पाहाण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.

तेलुगु सिनेमाने मिळवून दिली ओळख....
- नेहा तेलुगु फिल्म 'चिरुथा'मध्ये पहिल्यांदा झळकली होती. 2007 मध्ये हा सिनेमा रिलिज झाला होता.
- डायरेक्टर अश्विनी दत्त यांचा हा सिनेमा होता. सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण तेजासोबत नेहा रुपेरी पडद्यावर दिसली होती.
- नंतर नेहाला महेश भट्ट यांच्या 'क्रूक'मध्ये संधी मिळाली. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची खूप चर्चाही झाली होती.
- यंगिस्तान (2014), क्या कूल हैं हम (2012), जयंता भाई की लव्ह स्टोरी, यमला पगला दीवाना-2 सारख्या सिनेमातही तिने काम केले आहे.
- सध्या नेहा 'तुम बिन-2' आणि 'हेराफेरी-3' सारख्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, काँग्रेस आमदाराची अॅक्ट्रेस कन्या नेहाचे निवडक फोटोज....
बातम्या आणखी आहेत...