आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nehru's Government Spy On Netaji's Family For 16 Years

नेहरुंच्या सरकारने 16 वर्षे केली होती सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबाची हेरगिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबाची हेरगिरी केली होती का? इंटलीजंस ब्युरोच्या काही दस्तऐवजांमध्ये झालेल्या खुलाशानुसार नेहरू सरकारने 1948 ते 1968 पर्यंत बोस यांच्या कुटुंबाची हेरगिरी केली होती. या फाईल्स तेव्हापासून नॅशनल अर्काइव्हमध्ये सुरक्षित आहे. 1948 पासून 1968 पर्यंत वीस वर्षांतील 16 वर्षांत नेहरू देशाचे पंतप्रधान होते आणि गुप्तचरसंस्था थेट त्यांना रिपोर्टींग करायच्या. कारण त्यावेळी हे सर्व पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत होते.
या फाईल्समध्ये असा उल्लेख आहे की, आयबीने ब्रिटीश शासनकाळातील पद्धती सुरू ठेवल्या आणि नेताजींच्या मृत्यूनंतर कोलकाता येथील दोन घरांत राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांवर नजर ठेवली. या दरम्यान बोस यांच्या कुटुंबीयांना येणारी आणि त्यांच्याकडून जाणारी अशा पत्रांची कॉपी केली जात होती. तसेच त्यांच्या देश-विदेश दौऱ्यांवरही नजर ठेवली जात असे. बोस यांचे कुटुंबीय कोणाला भेटतात आणि काय चर्चा होते, हे जाणून घेणे हा आयबीचा मुख्य उद्देश होता. आयबीचे एजंट फोन अथवा छोट्या छोट्या नोट्सद्वारे त्यांचे रिपोर्ट पाठवत.

कुटुंबीयांना धक्का
आयबी नेताजींचे दोन्ही पुतणे (शिशिर कुमार बोस आणि अमिय नाथ बोस) वर नजर का ठेवत होती हे सांगता येत नाही. शिशिर आणि अमिय नाथ सरतचंद्र बोस यांची मुले होती. ते कांग्रेस कार्यकर्ता म्हणून नेताजींच्या कार्यकाळात त्यांच्या सर्वाधिक जवळचे होते. या दोघांनी नेताजींची पत्नी आणि त्यांची काकू एमिली यांना अनेक पत्रे लिहिली होती. त्या ऑस्ट्रयामध्ये राहतात. सध्या कोलकात्यात असलेले नेताजींची पणतू या खुलाशाने हैराण आहेत. गुन्हेगार किंवा दहशतवादी प्रवृत्तीच्या लोकांची हेरगिरी केली जाते. पण नेताजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला तर मग त्यांची हेरगिरी का केली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुलगीही नाराज
जर्मनीमध्ये अर्थतज्ज्ञ असलेली नेताजींची एकुलती एक मुलगी अनिता बोसनेही या मुद्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अनिता म्हणाली, सरतचंद्र म्हणजेच माझे काका 1950 पर्यंत काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. पण काँग्रेस नेतृत्त्वाशी ते सहमत नव्हते. पण माझ्या भावडांची हेरगिरी का केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश अशोक कुमार गांगुली यांनी, सरकार नेताजी आणि त्यांच्या कुटुंबाच्याबाबतीच पक्षपात का करतात असा प्रश्न केला आहे.

नेताजींच्या परतण्याची होती काँग्रेसला भिती
लेखक आणि भाजप प्रवक्ते एम.जे. अकबर यांच्या मते, नेताजींच्या कुटुंबाची एवढ्या काळ हेरगिरी करण्याचा एकच अर्थ असतो, तो म्हणजे त्यांना नेताजींच्या परतण्याची भिती होती. अकबर यांच्या मते, ‘ नेताजींचा खरंच मृत्यू झाला होता यावर कांग्रेस सरकारला विश्वासच बसत नव्हता. ते जिवंत असतील तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे कुटुंबीयांशी संपर्कात असतील, असे सरकारला वाटत होते. त्यामुळेच हेरगिरी करण्यात आली. दुसरी गोष्ट म्हणजे नेताजींचा करिश्मा वेगळा होता. ते सहजपणे लोकांना एकत्र करून काँग्रेसला सत्तेबाहेर करू शकत होते. 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. नेताजी जिवंत असते तर ते 1957 मध्येच घडले असते. म्हणजेच 15 वर्षांपूर्वीच काँग्रेस सत्तेबाहेर असती.

नेताजींनी सोडले होते काँग्रेसचे अध्यक्षपद
नेताजींशी संबंधित आयबीच्या फाइलींच्या मूळ कॉपी अजूनही पश्चिम बंगाल सरकारकडे आहेत. ‘इंडियाज बिगेस्ट कव्हर-अप’ पुस्तकाचे लेखत अनुज धर यांनी याचवर्षी जानेवारीत सर्वात आधी या फाइल्सच्या कॉपी पाहिल्या होत्या. त्यांच्या मते, या फाइल चुकून बाहेर आल्या. नेताजी 1933 मध्ये काँग्रेस अध्यक्ष बनले होते. पण गांधी आणि नेहरुंमधील मतभेदांमुळे त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर ते देशाबाहेर गेले. सांगितले जाते की ते आधी जर्मनी आणि मग जपानला गेले. जपानमध्ये त्यांनी 1943 मध्ये 40 हजार भारतीयांना एकत्र केले आणि आझाद हिंद फौजेची स्थापना केली. त्यावेळी नेताजींचे वय 48 वर्षे होते. त्यानंतर 18 अॉगस्ट 1945 ला नेताजींचा तैवानजवळ एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला असे मानले जाते. याच दिवशी जपानने शत्रूसमोर गुडघे टेकले होते. पण त्यांचा मृत्यू केव्हा आणि कसा झाला याबाबत अनेक वाद आहेत.

माहिती देण्यास सरकारची टाळाटाळ
नेताजींच्या मृत्यूचे गूढ कायम असण्याचे आणखी एक कारण म्हणजे भारत सरकारकडे सुमारे 150 अशा फाइल्स आहेत ज्या या मुद्यावर प्रकाश टाकू शकतात. पण सत्तेत आलेल्या एकाही सरकारने अद्याप त्याबाबत खुलासा केलेला नाही. 17 डिसेंबर, 2014 रोजी राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना गृहराज्य मंत्री हरिभाई प्रतिभाई चौधरी यांनी या फाईलमधील माहिती उघड केल्यास शेजारी राष्ट्रांशी संबंध बिघडण्याची भिती व्यक्त केली होती.