आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेपाळमध्ये प्रवासी विमान बेपत्ता झाल्याने खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू- 18 प्रवाशांना घेऊन उड्डाण करणार्‍या नेपाळी एअरलाइन्सचे एक विमान बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली.

ऑटर (9 एन-एबीबी) नावाच्या विमानात 14 वयस्कर, तर एक लहान मुलगा आहे. चालक विभागाच्या तीन सदस्यांचादेखील त्यात समावेश आहे. एक युरोपच्या डेन्मार्कमधील नागरिक आहे. चालकाकडून भैराहावा विमानतळावरून शेवटचा संपर्क झाला होता. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास संपर्क झाला होता, असे नेपाळच्या सूत्रांनी सांगितले.

विमानाच्या शोधासाठी दोन हेलिकॉप्टरची रवानगी करण्यात आली आहे. परंतु खराब हवामानामुळे शोधामध्ये अडथळे येत आहेत. नेपाळ एअरलाइन्सचे प्रवक्ते रामहरी शर्मा म्हणाले, विमानातून प्रवास करणारे 14 जण नेपाळी नागरिक आहेत तर एक डेन्मार्कचा नागरिक आहे. ट्विन ऑटरने रविवारी दुपारी इंधन भरले होते. दुपारी एकच्या सुमारास हे विमान भरकटत होते, अशी माहिती मिळाली. ही घटना खराब हवामानामुळे घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.