आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nepali Goons Loot And Rape Pilgrims Stranded In Kedarnath

महाप्रलयात अडकलेल्‍या भाविकांवर नेपाळी गुंडांचा हल्‍ला, महिलांवर बलात्‍कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून- उत्तराखंडमध्‍ये भीषण प्रलयानंतर संपूर्ण देशभरात चिंतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे काही नेपाळी समाजकंटकांनी तेथील बिकट परिस्थितीचा गैरफायदा घेऊन घृणास्‍पद कार्य केल्‍याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नेपाळी गुंडांनी केदारनाथ येथे अडकलेल्‍या भाविकांवर हल्‍ले केले. त्‍यांच्‍याकडील सामान आणि पैसे तर लुटून नेलेच, शिवाय महिलांवर बलात्‍कारही केला. गुंडांनी बँकांचे लॉकर्सही फोडले. हा प्रकार उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथून प्रकाशित होणा-या एका वृत्तपत्राने उघड केला आहे. काही भाविकांनी दूरध्‍वनीवरुन संपर्क करुन ही माहिती दिली.

भाविकांनी दूरध्‍वनीवरुन त्‍यांच्‍यावर ओढावलेला दुहेरी प्रलय सांगितला. केदारनाथ धामच्‍या आजुबाजूला पर्वत आणि जंगल आहे. तेथे नेपाळी गुंड नेहमी येत असतात. त्‍यांनी भाविकांवर हल्‍ला केला. सुमारे 50 गुंडांनी धारदार शस्‍त्रांसह भाविकांवर हल्‍ल करुन मारहाण केली. सामान, दागिने, मौल्‍यवान वस्‍तू या गुंडांनी हिसकावून घेतल्‍याच. शिवाय काही महिलांना ते जंगलात घेऊन गेले. तिथे त्‍यांच्‍यावर बलात्‍कार करण्‍यात आला. त्‍यापैकी काही महिला तर बेपत्ता आहेत. या प्रकारामुळे भाविकांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

एसबीआयचे लॉकर फोडले

नेपाळी गुंडांनी भारतीय स्‍टेट बँकेचे लॉकरही फोडले. महापुरात बँक वाहून गेली होती. तर वजनदार लॉकर अडकले होते. ते या लोकांनी उचलून नेले आणि फोडले. पोलिसांनी 5 नेपाळींना अटक केली आहे. त्‍यांच्‍याकडून साडे तीन लाख रुपये जप्‍त करण्‍यात आले आहेत.