आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखीच्या बहाण्याने बहिणीकडे आला भाऊ; काकासह केली चुलत भावजयीची निर्घृण हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- राखीच्या बहाण्याने चुलत बहिणीकडे आलेल्या एका भावाने कुटुंबातील सर्व सदस्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. बिहारमधील बांका जिल्ह्यात जमालपूरजवळील आशिकपूर येथे रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली.

आरोपी सत्यम हरि नामक तरुण राखी बांधण्यासाठी आपल्या काकाच्या घरी आला होता. राखी बांधण्याच्या आधीच त्याने चाकूने कुटुंबातील सगळ्यांवर हल्ला केला. त्यात सत्यमचा काका जगदीश हरि आणि चुलत भावजायी सीमाचा जागेवरच मृत्यू झाला. जगदीश यांचा मुलगा किरण कुमार आणि मुलगी रंजीता गंभीर जखमी झाली आहे.

सत्यमने चाकूने संपूर्ण कुटुंबियांवर हल्ला चढवताच सर्वत्र हाहाकार उडाला. रडण्याचा आवाज ऐकताच शेजारी राहाणारे लोक हरी यांच्याघराबाहेर गोळा होताच आरोपी सत्यम याने पळ काढला. शेजारी राहाणार्‍या लोकांनी जखमी किरण आणि रंजीताला हॉस्पिटलला हलवले.

सत्यम याने केली होती पत्नीची हत्या...
- आरोपी सत्यम रविवारी चुलत बहिणीकडे राखी बांधण्यासाठी आला होता.
- सत्यम याने स्वत:च्या पत्नीचीही हत्या केली होती. सत्यमला शिक्षाही झाली होती. तेव्हापासून जगदीश हरी यांनी त्यांच्याकडे जाणं-येणं दं केले होते. परंतु सत्यम राखी बांधण्यासाठी आल्याने सर्व शांत होते.
- रविवारी सायंकाळी सत्यमने सगळ्यांसोबत जेवण केले. नंतर सगळे झोपले तेव्हा त्याने मध्यरात्री कुटुंबातील सगळ्यांवर चाकूने हल्ला केला. त्यात काका जगदीश हरी आणि चुलत भावजायी सीमाचा जागेवरच मृत्यू झाला.
- जगदीश हरी यांचे वडिलोपार्जित घर बांका येथे आहे. ते रेल्वेत काम करत होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते जमालपूर येथे स्थायिक झाले होते.
- एएसपी हरी शंकर कुमार यांनी सांगितले की, आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहे.

घटनेशी संबंधित छायाचित्रे पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...