आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काकूशी संबंध बनवतानाच चिरला गळा, कापलेले शिर सोबत घेऊन गेला पुतण्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदनामीच्या भीतीने पुतण्याने चुलतीची हत्या केली. - Divya Marathi
बदनामीच्या भीतीने पुतण्याने चुलतीची हत्या केली.

प्रतापगड - येथे 19 नोव्हेंबर रोजी एका पोत्यात शिर नसलेला मृतदेह आढळल्याप्रकरणी आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुण मृत महिलेचा पुतण्या आहे. 36 वर्षीय महिलेच्या हत्येनंतर आरोपीने कापलेले शिर एका विहिरीत फेकले होते. पोलिसांनी कापलेले शिरही हस्तगत केले आहे. एएसपी रतनलाल भार्गव म्हणाले की, पुतण्याचे त्याच्या चुलतीशी अवैध संबंध होते. पोलिसांनी आरोपी जगदीश (23) मीणाला अटक केली आहे. 

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- पोलिसांना आरोपी म्हणाला की, काकी 10 हजार रुपये देण्यासाठी दबाव टाकत होती. पैसे न दिल्यास समाजात बदनामी करण्याची धमकी देत होती. पैशांचा दबाव आणि बदनामीच्या भीतीने मी काकीचा गळा चिरून खून केला.
- बरोल घाटात मी तिच्याशी अवैध संबंध बनवत असतानाच काकीचा गळा चाकूने चिरला. यानंतर मृतदेह एका पोत्यात भरून तिथेच ठेवला. कापलेले शिर टॉवेलमध्ये लपेटून बाइकवरून 20 किमी अंतरावरील माझ्या गावात परतलो. तेथे ते झुडपात लपवले. यानंतर घटनास्थळी पोहोचलो. धड एका पोत्यात होते, ते झांतला धरणात नेऊन टाकले.

 

अशी केली होती हत्या...
- पोलिसांनी सांगितले की, 13 नोव्हेंबर रोजी सकाळी आरोपी जगदीश आणि त्याची काकी त्याच्या मावशीकडून लग्नासाठी पैसे आणण्याचा बहाणा करून घरातून बाइकवर निघाले होते. चाकू त्याने आधीपासूनच शर्टात लपवला होता. वाटेत ते घाटात पोहोचले. येथे त्याने हातपाय धुण्याच्या बहाण्याने बाइक उभी केली. तेथे काही अंतरावर त्याने एका जागी खूण करून चाकू लपवला. येथून एका हॉटेलमध्ये गेले. तेथे आधार कार्ड दाखवून एक रूम किरायाने घेतली. त्या रूममध्ये त्याने काकीशी शारीरिक संबंध बनवले.

 

बिअर प्यायल्यानंतर शारीरिक संबंध बनवले होते, चाकूने चिरला होता गळा
- घरी पोहोचलेल्या काकाने काकीविषयी विचारले तेव्हा म्हणाला की, काकीला प्रतापगड बसस्टँडवर सोडले आहे. यानंतर बाइक घेऊन पुन्हा हॉटेलमध्ये काकीजवळ पोहोचला. वाटेत त्याने ढाब्यावरून एक बिअर घेतली. बिअर पिण्यासाठी तो काकीला घेऊन चाकू लपवलेल्या जागेवर घेऊन गेला. येथे त्याने बिअर प्यायली आणि काकीशी शारीरिक संबंध बनवले. यादरम्यान त्याने चाकूने काकीचा गळा चिरून शिर धडावेगळे केले. आरोपीच्या जबाबावरून पोलिसांनी कापलेले शिर हस्तगत करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. आरोपीला कोर्टापुढे हजर केले असता त्याची कोठडीत रवानगी झाली आहे.

 

पैसे नव्हते, काकीने दिली होती अवैध संबंध उघड करण्याची धमकी
- एएसपी म्हणाले की, आरोपी जगदीश मीणाने पोलिस चौकशीत सांगितले की, काकीशी त्याचे एक वर्षापासून अवैध शारीरिक संबंध होते. काकीच्या मुलीचे लग्न नुकतेच ठरले होते. यासाठी ते पैसे आणण्याच्या बहाण्याने नातेवाइकाकडे गेले होते. लग्नासाठी पैसे दे म्हणून काकीही आरोपीवर दबाव टाकत होती. पैसे न दिल्यास संबंध उघड करून बदनामीची धमकी तिने आरोपीला दिली होती.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनास्थळाचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...