आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Neta Ji Subhash Chandra Bose Birth Anniversary Interesting Pictures

BHU च्या प्राध्यापकांनी नेताजींवर 7 वर्षे केले संशोधन, सापडले नवे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - नेताजींचे अखेरचे छायाचित्र 17 ऑगस्ट 1945 ला हेलिकॉप्टरमधून उतरताना - Divya Marathi
फोटो - नेताजींचे अखेरचे छायाचित्र 17 ऑगस्ट 1945 ला हेलिकॉप्टरमधून उतरताना
वाराणसी - आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रणेते सुभाष चंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यांना लोक नेताजी नावानेही ओळखत होते. त्यांनी देशातील पहिले महिला सैन्यदल स्थापन केले होते. त्याचबरोबर विशेष रणनीतीच्या आधारे आजाद हिंद फौजेचीही स्थापना केली होती. नेताजींवर बनारस हिंदु विद्यापीठाचे प्राध्यापक राजीव श्रीवास्तव गेल्या सात वर्षांपासून संशोधन करत आहेत. त्यांनी नेताजींची काही दुर्मिळ छायाचित्रे आणि रंजक माहिती मिळवली आहे.

नेताजींची अनेक अशी दुर्मिळ छायाचित्रे आहेत, जी स्वतःच त्यांच्या कार्याबाबत बरेच काही सांगून जातात. पण त्यांचे अत्यंत मोजके फोटोच जगासमोर आले आहेत. त्यामुळे इतर काही रंजक माहिती असणारे फोटो आम्ही दाखवणार आहोत.

कुटुंबात 14 भावंडे
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 ला ओरिसाच्या कटकमध्ये एका समृद्ध बंगाली कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव 'जानकीनाथ बोस' आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते. प्रभावती आणि जानकीनाथ यांना एकूण 14 मुले होती. त्यापैकी सहा मुली आणि आठ मुले होती. सुभाष चंद्र हे त्यांचे पाचवे पुत्र आणि नववे अपत्य होते. सर्व भावांमध्ये सुभाष यांना शरदचंद्र याच्यावर सर्वाधिक स्नेहभाव होता.

1943 मध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना
नेताजी नावाने प्रसिद्ध झालेल्या सुभाषचंद्र बोस यांनी सशक्त क्रांतीद्वारे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने 21 ऑक्टोबर 1943 मध्ये 'आजाद हिंद सरकार'ची स्थापना केली होती. या संघटनेच्या झेंड्यावर एका डरकाळी फोडणार्‍या वाघाचे चित्र असायचे. नेताजी त्यांच्या आजाद हिंद फौजेबरोबर ४ जुलै 1944 ला बर्मा येथे पोहोचले. येथेच त्यांनी 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा' ही प्रसिद्ध घोषणा दिली होती.

पुढे पाहा, त्यांच्या जीवनाशी संबंधित काही रंजक छायाचित्रे...