आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Netaji Subhash Chandra Files Kin Sought Japanese Help For Insurrection Against British

नेताजींचे भाऊ करणार होते ब्रिटिशांविरुद्ध बंड; जापानला मागितली होती मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेताजी यांचे कुटुंबांसोबतचे छायाचित्र - Divya Marathi
नेताजी यांचे कुटुंबांसोबतचे छायाचित्र
कोलकाता - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मोठे भाऊ शरतचंद्र बोस हे जपानच्‍या मदतीने ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड करणार होते. त्‍यासाठी त्‍यांनी जपानकडे मदतही मागितली होती, ही बाब पश्चिम बंगाल सरकारने उघड केलेल्‍या 64 गोपनीय फाइलीमधून समोर आली आहे.
50 हजार सैनिकांनी फळी उभारण्‍याचा दावा
शरत यांनी कोलकात्‍त्‍यावरून जापानच्‍या एका अधिकाकऱ्याला 18 सप्‍टेंबर 1941 रोजी एक पत्र लिहिले होते. त्‍यावेळी नेताजी भूमिगत होते. या पत्रात शरत यांनी म्‍हटले होते की, ब्रिटिश सरकारच्‍या विरोधात जपानला मदत करण्‍यासाठी आमच्‍याकडे 10 सैनिक आहेत. या शिवाय या विरुद्ध लढण्‍यासाठी 50 हजार सैनिक तयार केले जातील, असा दावा त्‍यांनी यातून केला होता. या कामी तुम्‍ही आम्‍हाला मदत करा, अशी मागणीसुद्धा या पत्रातून त्‍यांनी केली होती. ओहटा नावाच्‍या व्‍यक्‍तीला त्‍यांनी हे पत्र लिहिले होते.
का मागितली जपानकडे मदत
दुसऱ्या महायुद्धात जपान आणि जर्मनी ब्रिटेन आणि त्‍याच्‍या मित्र पक्षाच्‍या विरोधात रणभूमीमध्‍ये उतरले होते. याचाचा फायदा शरत घेऊ इच्छित होते. त्‍यामुळे जपान भारताला मदत करेल, अशी आशा त्‍यांना होती.
शस्‍त्र आणि पैशांची मागणी केली
शरत यांनी पत्रात म्‍हटले होते की, 'सध्‍या आमच्‍याकडे 10 हजार लोक आहेत. पण, काहीच महिन्‍यांत आम्‍ही 50 हजार सैनिक तयार होतील. त्‍यासाठी आम्‍हाला शस्‍त्रे आणि पैशाची गरज आहे. आपण आम्‍हाला ते उपलब्‍ध करून देऊ शकाला ? तुमच्‍याकडून होत नसेल तर पर्यायी व्‍यवस्‍था सांगा. आमच्‍यासाठी ते खूप महत्‍त्‍वाचे', असे त्‍यांनी पत्रात लिहिले होते. पण, हे पत्र त्‍यावेळी कोलकाता पोलिसांच्‍या हाती लागले.
नेताजी जपानमध्‍ये ?
शरत यांनी लिहिलेल्‍या या पत्रात ‘S’ या अक्षराचा उल्‍लेख केला होता. हे अक्षर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्‍यासाठीच लिहिले गेले असावे. शरत यांनी लिहिले होते की, “आपली जी चर्चा सुरू आहे, त्‍या बाबत आपण तत्‍काळ ‘S’ लासुद्धा निरोप द्या.” त्‍यावेळी गांधींजीसोबत झालेल्‍या मतभेदामुळे नेताजी यांनी भारत सोडला होता. अगोदर ते जर्मनीला गेले; नंतर जपानला. येथेच त्‍यांनी ‘आजाद हिंद फौज’ बनवली होती.

यूरोपबाबत चर्चा
यात शरत यांनी यूरोपबाबतसुद्धा चर्चा केली होती. त्‍यांनी त्‍यात म्‍हटले होते, “ तुम्‍हाला ‘S’कडून काही निरोप मिळाला ? यूरोपमध्‍ये होत असलेल्‍या घटनांबद्दल तुमच्‍याकडे काय माहिती आहे ? येणाऱ्या उन्‍हाळ्यामध्‍ये जर्मनी इराणविरुद्ध कारवाई करणार आहे ? या बाबत सविस्‍तर माहिती मला पाठवा” हे पत्र लिहिण्‍यापूर्वी नेताजी 16 जानेवारी 1941 ला कोलकाता येथून भूमिगत झाले होते. त्‍यांना येथे नजर कैदेत ठेवण्‍यात आले होते.
पाच हजारांत काम सुरू होऊ शकते
शरत यांनी पत्रात लिहिले, “ पाच हजार रुपयांत आम्‍ही काम सुरू करू शकतो. सुरुवातीला आम्‍ही तुम्‍हाला गोपनीय माहिती देऊ. तुम्‍हाला जर माझा प्रस्‍ताव आवडला तर प्रोत्‍साहन द्या.”
मृत्‍यूपर्यंत होत होती जासूसी
ब्रिटिश सरकारकडून शरत यांची जासूसी होतच होती. पण, स्‍वातंत्र्यानंतरही त्‍यांच्‍या मृत्‍यूपर्यंत भारत सरकारने त्‍यांची जासूसी केली. 1950 पर्यंत त्‍यांच्‍यावर सरकार लक्ष ठेवून होते. या प्रकरणी कोलकाताचे तत्‍कालीन पोलिस उपायुक्‍त यांनी सीआयडीला लिहिलेल्‍या पत्रांतून पुरावा मिळतो.