आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Netaji Subhashchandra Bos Grand Nephew Chandra Kumar Bose In BJP

नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस यांचा भाजपमध्ये प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हावडा - आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाइल्स केंद्र सरकारने सार्वजनिक केल्याच्या दोन दिवसांनंतर नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नेताजींच्या ११९ व्या जयंतीचे औचित्य साधत सरकारने या फाइल्स सार्वजनिक केल्या. या डिजिटल दस्तऐवजातून नेताजींच्या गूढ मृत्यूवरील पडदा उठेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकुमार बोस यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या वेळी झालेल्या सभेत शहा यांनी ममता बॅनर्जी सरकारला लक्ष्य केले. राज्य चिट फंड उद्योगातून समृद्ध होत असताना ते राष्ट्रविरोधी कारवाया व बनावट चलनासाठी सेफ हेव्हन ठरल्याचा आरोप शहा यांनी केला. नेताजींच्या १०० फाइल्स सार्वजनिक करण्याच्या कार्यक्रमास चंद्रकुमार बोस उपस्थित होते.
राज्यातील निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आपल्याकडे हुकमी पत्ता म्हणून पाहतेय काय, या प्रश्नावर चंद्रकुमार यांनी विजयी किंवा पराभूत कार्डच्या दृष्टीने पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हटले आहे. सर्व धर्मांत एकात्मता साधणारा समग्र भारत असावा, असा नेताजींचा विचार होता. हा विचार आता पुन्हा अमलात आणावा, असे बोस म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, नेताजींच्या अस्थींच्या संरक्षणा संदर्भात